शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मजूरांच्या गावकडच्या प्रवासाला लाभली चाकांची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 15:48 IST

नाशिकरोडचे समाजसेवक फ्रान्सिस वाघमारे हे नाशिकला सायकलवर जात असताना नाशिक-पुणे मार्गावरील नासर्डी पुलाजवळ पायी चाललेले सहा युवक पाच दिवसापूर्वी त्यांना दिसले.

ठळक मुद्देपायपीट करत नाशिकला पोहचलेपुण्याच्या चाकण येथे मोलमजूरीचे काम करत होते

नाशिक : सहाब, आप हमारे लिये किसी भगवानसे कम नहीं हो, आपने हमें साईकिल नहीं, इस लॉकडाउन के समय जैसे मानो प्लेनही दे दिया हों, हम जिंदगीभर आपके एहसानमंद रहेंगे..., अशा भावना मध्यप्रदेशमधील इंदोर सायकलींद्वारे गाठणाऱ्या त्या सहा मजूर युवकांनी व्यक्त केल्या.पुण्याहून नाशिकमार्गे मध्यप्रदेशमधील कटनी जिल्ह्यात घरी पायी जाण्यास निघालेल्या युवकांना नाशिकरोड येथील सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सीस वाघमारे यांनी विद्यार्थी व त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने सायकली उपलब्ध करून दिल्या आणि त्या मोलमजूरी करत भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावणा-या मजूरांच्या नाशिक ते मध्यप्रदेश या प्रवासाला चाकांची गती अखेर लाभली. हे मजूर पुण्याहून सुमारे दोनशे ते अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत नाशिकरोडला आले होते.कोरोनाच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अ़नेक परप्रांतीय बि-हाडासह पायीच शेकडो किलोमीटरचा प्रवास करत गावी चालले आहेत. नाशिकरोडचे समाजसेवक फ्रान्सिस वाघमारे हे नाशिकला सायकलवर जात असताना नाशिक-पुणे मार्गावरील नासर्डी पुलाजवळ पायी चाललेले सहा युवक पाच दिवसापूर्वी त्यांना दिसले. भूक व तहानेमुळे व्याकुळ झालेल्या त्या युवकांना चालता देखील येत नव्हते. वाघमारे यांनी त्यांची विचारपूस ते मजूर युवक मध्यप्रदेशातील कटनी जिल्ह्यातील रहिवासी असून पुण्याच्या चाकण येथे मोलमजूरीचे काम करत होते. लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांची उपासमार सुरु झाल्यामुळे पायी प्रवासाला निघाले होते. पायपीट करत नाशिकला पोहचले. सुदैवाने वाघमारे यांनी मदतीचा हात पुढे केल्याने येथून पुढच्या त्यांच्या प्रवासाला चाकांची गती मिळाली. 

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस