गेल्या ३५ वर्षांपासून या गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झालेली नव्हती; परंतु कायमच निवडणुकीमुळे गावातील वातावरण दूषित करण्यापेक्षा आपणा सर्वांनी एकत्र येऊन सर्व ९ जागा बिनविरोध करण्याचा विचार माघारीच्या दिवशी घेण्यात आला. त्यांत प्रभाग १ मधून मालतीबाई प्रकाश गांगुर्ड , सुरेश दगू चारोस्कर ,मंगेश पोपट लोखडे तर प्रभाग २ मधून गोविंद दामोधर गायकवाड, रेणुका अक्षय गायकवाड, नीता विनायक शेवरे, तसेच प्रभाग ३ मधून अशोक सखाराम गायकवाड, ज्ञानेश्वर पुडलिंक भुसारे, भामा नामदेव गावित या तीनही प्रभागातील उमेदवारांची माघारीच्या अखेरच्या दिवशी गावातील लोकांनी एकत्र येऊन समजूत काढून निवडणूक बिनविरोध केली. या निवडणुकीसाठी माजी आमदार रामदास चारोस्कर , सुनील गायकवाड, शांताराम गांगोडे, विनायक शेवरे, अनिल रेहरे, सुभाष ढगे, भाऊसाहेब गुंबाडे आदीनी मार्गदर्शन केले.
जोरण निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:53 IST