लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सप्तशृंगगडावर वादळी वाºयासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. रविवारी सकाळच्या सुमारास हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला तर दुपारी पावसाचे स्वरूप भयावह होते.वादळी वारा व पावसामुळे गडावर जिकडे तिकडे पाणीचपाणी साचले होते. अवघ्या पाण्याचे लोंढेचे लोंढे गडावरून पर्वतरांगाचा मार्ग शोधत प्रवाहीत होत असतानाचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावरुन व्हायरल झाले आहे. अनेक किलोमीटर अंतरावरुन पाण्याचा प्रवाह धबधब्याच्या स्वरुपात पवर्तावरुन भुभागाकडे येत असतानाचे आकर्षक नैसर्गिक सौंदर्याचे फोटो अनेकांनी शेअर केले . गडावरील दुकानामधील वस्तुंचे नुकसान झाले. दुकानाचे पडदे फाटले. काही दुकानांचे प्लास्टिक उडाले. काही दुकानाचे पत्रे उडाले तर अनेकांच्या दुकानातील प्रसाद साड्या व इतर वस्तु पावसामुळे ओल्या झाल्या. गडावर दुपारी दीड वाजेच्या सुमारास पावसास प्रारंभ झाला. दुपारी ४ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्या दरम्यान रस्त्यावरचे काही दिसेनासे झाले होते.वणी शहरातही रविवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. देवनदीला पुर आला होता. गडावरील पावसामुळे देवनदीमार्गे जाणारे पाणी ओझरखेड धरणात जात असल्याने ओझरखेड धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. काही दिवस पावसाने ब्रेक घेतला होता, मात्र रविवारी पावसाने रौद्र स्वरुप दाखविल्याने सगळीकडे पाणीच पाणी दिसुन येत होते. दरम्यान दिंडोरी व चांदवड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पारेगाव धोडंबे त्यापुढे असलेले कानमंडळे खर्डे परीसरातही जोरदार पाऊस झाला पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी झाला होता हा पाऊस काही पिकांना अनुकूल तर काही पिकांना प्रतिकुल मानन्यात येत आहे दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास पावसाने उघडीप दिल्याने सूर्यनारायणाचे दर्शन झाले. लोहोणेरला ऊस भुईसपाटलोहोणेर : परिसरात रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे येथील प्रगतिशील शेतकरी रामराव देशमुख यांचे ऊस पिकाचे नुकसान झाले. ऊस अक्षरश: भुईसपाट झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून सदर नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रामराव देशमुख यांनी केली आहे.
सप्तशृंगगडावर ‘जोर’धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 18:13 IST
वणी : सप्तशृंगगडावर वादळी वाºयासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. रविवारी सकाळच्या सुमारास हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला तर दुपारी पावसाचे स्वरूप भयावह होते.
सप्तशृंगगडावर ‘जोर’धार
ठळक मुद्देजनजीवन विस्कळित : वादळी वाऱ्यासह परिसराला झोडपले