चांदवड - चांदवड तालुक्यातील जोपुळ येथील सरपंच सौ. सिंधुबाई केशव सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली व जोपुळ सोसायटीचे चेअरमन संजय दगुजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा संपन्न झाली. ग्रामसभेत गावच्या विविध विकासाच्या योजनांचे नियोजन करण्यात आले व मंजुर झालेल्या योजनांचे वाचन करण्यात आले. विविध योजनांचे कामे चांगल्याप्रकारे व उत्तम दर्जाची करण्यात यावी. रस्ता कॉक्र ीटीकरण, सौर उर्जेचे बल्प, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, स्मशानभुमी सुशोभिकरण करणे, ठक्कर बाप्पा योजनेतंर्गत आदिवासी वस्तीत पाण्याची टाकी बांधकाम करणे, रस्ता कॉंक्र ीटीकरण इ. कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी. तसेच नवीन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये गावाचा समावेश असुन या योजनेतंर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेची सविस्तर चर्चा करण्यात आली. जोपुळ गावात 44 गाव योजनेतंर्गत पाईपलाईन करण्यात यावी किंवा केदराई धरणामधुन जोपुळ गावासाठी स्वतंत्र विहीर करु न नवीन पाईपलाईन आणुन संपुर्ण गावतंर्गत नळ कनेक्शन करण्यात यावे. अशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार नवीन अंदाजपत्रके तयार करुन घेऊन पुढील होणा-या ग्रामसभेमध्ये मंजुरीस्तव ठेवण्यात यावे. असे सर्वानुमते ठरविण्यात आले. ग्रामसभेस ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यामध्ये बांध रस्ते, शिव रस्ते, अंतर्गत शेतीतील वाद होवू नये व शासनाच्या धोरणाप्रमाणे गावातल्या गावात वाद मिटविण्यात यावे, याकरीता नवीनतंटामुक्ती कमिटीची नेमणुक करण्यात आली. सरपंच सौ. सिंधुबाई सोनवणे यांनी संजय जाधव व बाळासाहेब वाघ यांना गावातील विविध विकास कामांसाठी मदत करावी. अशी विनंती केली.सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीला विकास कामे करणेसाठी व विविध योजनांचे गावामध्ये राबविण्यासाठी हातभार लावावा व सर्व तरु ण शेतकरी बांधवांनी शेततळे, अस्तरीकरण, कांदा चाळ, ट्रक्टर, बांध रस्ते, शिव रस्ते, इंधन विहीरी व विविध वैयिक्तक लाभाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय जाधव यांनी केले. कृषि सहाय्यक चव्हाण, आरोग्य सेविका सौ.झाल्टे यांनी शासनाच्या विविध योजनांवर मार्गदर्शन केले. ग्रामसभेस उपसरपंच भास्कर दाते, ग्रामसेवक पवार, जयंत जाधव, अंगणवाडी सेविका, कैलास सोनवणे, पप्पु कोतवाल, नवनाथ दाते, रमण जाधव, ज्ञानेश्वर वाघ, केशव सोनवणे, शिवाजी जाधव, पंडीत जाधव, कारभारी कोतवाल, रामदास जाधव, बापु कोतवाल, परशराम केदारे, संदिप वक्टे, राहुल कोतवाल, रामभाऊ गोधडे, लक्ष्मण जाधव, पांडुरंग जाधव, बारकु जाधव, गोविंद गोसावी, गवळी गुरु जी, पुंजा माऊली, अनिता जाधव, शोभा जाधव, शोभा गोधडे आदि उपस्थित होते.
जोपूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 17:50 IST
चांदवड - चांदवड तालुक्यातील जोपुळ येथील सरपंच सौ. सिंधुबाई केशव सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली व जोपुळ सोसायटीचे चेअरमन संजय दगुजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा संपन्न झाली. ग्रामसभेत गावच्या विविध विकासाच्या योजनांचे नियोजन करण्यात आले व मंजुर झालेल्या योजनांचे वाचन करण्यात आले. विविध योजनांचे कामे चांगल्याप्रकारे व उत्तम दर्जाची करण्यात यावी. रस्ता ...
जोपूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विकास कामांवर चर्चा
ठळक मुद्देगावच्या विविध विकासाच्या योजनांचे नियोजन