लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रदीप सहादु शेवाळे यांच्या घरी सोने-चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असा बहाणा करत सुमारे तीन तोळ्यांचे दागिने भामट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या चोरट्यांनी ठेंगोडा गावांत अनेक घरी जाऊन सोने-चांदी पॉलिश करण्याची पावडर विक्री करत असल्याचे सांगत भेटी देखील दिल्याचे समोर आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी (दि.१०) दुपारच्या वेळी ठेंगोडा येथील माजी सरपंच प्रदीप शेवाळे यांच्या घरी असलेल्या ललिता प्रदीप शेवाळे यांना चांदी व पितळेच्या भांड्याला पॉलिश करून देतो असे सांगत सुरूवातीला चांदीच्या मूर्तीला पॉलिश करून दिली. त्यानंतर त्यांना बोलण्यात गर्क ठेवत पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला व ललिता शेवाळे यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याची सोन्याची माळ व एक तोळ्याचे कानातील दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने हातोहात लांबवले.त्या भामट्यांजवळ असलेल्या गुंगीचे औषध वजा पावडरीमुळे शेवाळे यांना गुंगी आली. त्यानंतर चोरट्यांनी दागिने लांबवले. थोड्यावेळाने शुद्धीवर आलेल्या शेवाळे यांनी आरडाओरडा केला. तोपर्यंत भामटे पसार झाले होते. याबाबत सटाणा पोलीस स्टेशनला प्रदीप शेवाळे व ललिता शेवाळे यांनी तक्रार दिली असून पुढील तपास सटाणा पोलीस करत आहेत.
पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 23:38 IST
लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रदीप सहादु शेवाळे यांच्या घरी सोने-चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असा बहाणा करत सुमारे तीन तोळ्यांचे दागिने भामट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या चोरट्यांनी ठेंगोडा गावांत अनेक घरी जाऊन सोने-चांदी पॉलिश करण्याची पावडर विक्री करत असल्याचे सांगत भेटी देखील दिल्याचे समोर आले आहे.
पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबविले
ठळक मुद्दे असून पुढील तपास सटाणा पोलीस करत आहेत.