शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जेईई, नीट परीक्षेच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 01:10 IST

नाशिक : कोरोनाचे संकट लक्षात घेवून जीईटी-नेट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी नाशिक शहर कॉँग्रेसच्या कमिटीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.

नाशिक : कोरोनाचे संकट लक्षात घेवून जीईटी-नेट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी नाशिक शहर कॉँग्रेसच्या कमिटीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.यावेळी तहसीलदार शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात काँग्रेसने म्हटले आहे की, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत जीईटी-नेट या परीक्षा केंद्र सरकारने घेणे योग्य नाही. या परीक्षांना हजर राहण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर असंख्य अडचणी आहेत. देशभर कोरोना विषाणूचे संक्रमण अजून कायम असुन धोका कमी झालेला नाही. कोरोनावर मात करण्यासाठी गर्दी टाळणे हा महत्वाचा उपाय सरकारनेच सुचवलेला आहे. अशा वेळी लाखो विध्यार्थीना जीईटी-नेट ची परीक्षा देण्यासाठी आग्रह करणे हे संयुक्तिक ठरणार नाही. परीक्षा केंद्रात परीक्षा घेण्यासाठी लागणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे एकत्र आल्यास कोरोना संक्रमण होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने लाखो विध्यार्थी,पालक, शिक्षक व परीक्षेशी निगडित इतर घटकांच्या आरोग्य व भवितव्याचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. निदर्शने आंदोलनामध्ये शहर अध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, महिला शहर अध्यक्षा वत्सला खैरे, युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील, रईस शेख, सुरेश मारू, विजय राऊत, अनिल कोठुळे, प्रमोद धोंडगे, संतोष ठाकूर, बबलु खैरे, उद्धव पवार, दिनेश निकाळे, कैलास कडलग आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेस