निफाड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नैताळे ग्रामस्थांचे ग्रामदैवत मतोबा महाराज यांच्या यात्रोत्सवास पौष पौर्णिमेपासून प्रारंभ झाला. यानिमित्त गुरुवारी (दि. १२) पहिल्या दिवशी सकाळी शीतल व समीर धारराव आणि सुशील व कुंदा भालेराव यांच्या हस्ते मतोबा महाराजांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. माजी आमदार दिलीप बनकर व जिल्हा परिषद सदस्य मंदाकिनी बनकर यांच्या हस्ते रथाची पूजा करून सजवलेल्या रथातून मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मतोबा महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी आमदार अनिल कदम, आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, अमृता पवार, जिल्हा परिषद सदस्य भारती पवार, दिगंबर गिते, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुभाष कराड, संचालक पंढरीनाथ थोरे, ललित दरेकर, शिवनाथ जाधव, बाळासाहेब क्षीरसागर, भास्कर पानगव्हाणे, गोकुळ गिते, अनिल कुंदे, प्रकाश अडसरे, देवदत्त कापसे, सागर कुंदे, श्रीरामनगरचे सरपंच भीमराज काळे, रावसाहेब गोळे, रितश टर्ले, सचिन जाधव, पुंजाअप्पा तासकर, नवनाथ बोरगुडे, राजेंद्र बोरगुडे, शिवाजी बोरगुडे, गंगाराम खलाटे, लक्ष्मण खलाटे, विठ्ठल खलाटे, वैभव गाजरे आदि मान्यवरांचा मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी देवस्थानचे अध्यक्ष केदू नाना बोरगुडे, उपाध्यक्ष सोपान काका बोरगुडे यांच्यासह विश्वस्त मंडळ, सरपंच सुनीता तळेकर, उपसरपंच अरविंद पाटील बोरगुडे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष देवीदास गोधडे आदि प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)
नैताळे येथील यात्रोत्सवास प्रारंभ
By admin | Updated: January 14, 2017 00:12 IST