शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जानोरी धान्य घोटाळा पूर्ववैमनस्यातून उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:31 IST

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे पकडण्यात आलेला धान्याचा साठा हा रेशनचा काळाबाजार करणाºया टोळ्यांमधील पूर्ववैमनस्यातून उघडकीस आला असून, त्यात एका टोळीने पोलिसांना धान्याची सुपारी दिली, तर दुसºया टोळीने ग्रामीण पोलिसांच्या मदतीने स्वत:चा बचाव करण्यासाठी अटक करवून घेतल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. संपत घोरपडे याने पवन चौधरी याला संपविण्यासाठी पोलिसांची मदत घेतल्याचेही आता बोलले जात असून, यात पोलिसांचा एक गट चौधरी यालाही मदत करीत आहे.

ठळक मुद्देएका टोळीने पोलिसांना धान्याची सुपारी दिली,वाडीवºहे येथील रेशन धान्य काळाबाजाराचे कारण दोघांची जामिनावर मुक्तता

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे पकडण्यात आलेला धान्याचा साठा हा रेशनचा काळाबाजार करणाºया टोळ्यांमधील पूर्ववैमनस्यातून उघडकीस आला असून, त्यात एका टोळीने पोलिसांना धान्याची सुपारी दिली, तर दुसºया टोळीने ग्रामीण पोलिसांच्या मदतीने स्वत:चा बचाव करण्यासाठी अटक करवून घेतल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. संपत घोरपडे याने पवन चौधरी याला संपविण्यासाठी पोलिसांची मदत घेतल्याचेही आता बोलले जात असून, यात पोलिसांचा एक गट चौधरी यालाही मदत करीत आहे.  या घटनेमागे चालू वर्षी मार्च महिन्यात घडलेल्या वाडीवºहे येथील रेशन धान्य काळाबाजाराचे कारण दडलेले असून, ग्रामीण पोलिसांनी वाडीवºहे येथील गुन्ह्णातील आरोपींना मोक्कान्वये कारावाई केली होती व त्यात संपत चौधरीसोबत त्याचे दोघे भाऊही सहा ते सात महिने तुरुंगात होते, त्यातील संपत वगळता अन्य दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून, या साºया प्रकरणामागे पवन चौधरी हाच होता, असे घोरपडे यांना पुरावे मिळाले आहेत. पवन चौधरी हा त्या गुन्ह्णात मुख्य साक्षीदार आहे, तसेच ग्रामीण पोलीस दलातील एका निवृत्त पोलीस उपअधीक्षकाच्या मदतीने घोरपडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्यामुळे पवन चौधरी याचादेखील त्याचपद्धतीने काटा काढायचा विडा घोरपडे कुटुंबीयांनी उचलून चौधरी याच्या जानोरी येथील खासगी गुदामावर पोलिसांकरवी छापा घडवून आणला आहे. ज्या दिवशी चौधरी याच्या गुदामावर छापा मारण्यात आला त्याचदिवशी रात्री ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाºयासोबत घोरपडे हा त्याठिकाणी गेला होता व त्यांनी गुदामाला बाहेरून कुलूप लावून घेतले होते. त्यानंतर पवन चौधरीने दिंडोरी पोलिसांना गुदामात चोरी झाल्याची खबर देऊन पोलिसांना बोलावून घेतले होते. रात्री दिंडोरी पोलिसांनी या प्रकरणावर कसाबसा पडदा टाकला असतानाच, पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौधरी याच्या गुदामावर छापा मारल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हे शाखेने हा छापा मारत असताना दिंडोरी पोलिसांना अंधारात ठेवले, मात्र घोरपडे याच्याकडून आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगत पवन चौधरी हा स्वत:हून पोलिसांकडे अटक करण्यासाठी गेला होता, असेही आता बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेला पवन चौधरी याच्या गुदामाची खबर घोरपडे याने दिली, हे जसे लपून राहिलेले नाही, तसेच पवन चौधरी याला पोलिसांनीच अभय दिले आहे. रेशन दुकानदार हवालदिल रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारे घोरपडे व चौधरी यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या गुदामांवर अनेकवार छापेही पडले आहेत. काही विशिष्ट रेशन दुकानदारांना हाताशी धरून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा गोरख धंदा सुरू आहे. परंतु आता त्यांच्यातील वैमनस्य एकमेकांना संपविण्यापर्यंत पोहोचल्याने त्यांच्याशी संबंधित रेशन दुकानदार हवालदिल झाले आहेत. अशा दुकानदारांवर पुरवठा खातेही पाळत ठेवून आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCrimeगुन्हा