व्यासपीठावर प्राचार्य किशोर जाधव, बाळासाहेब वारुंगसे, सोमनाथ गिरी, कचेश्वर शिंदे, मंजुषा आहेर, सोमनाथ पगार, रेखा खंडीझोड, विजय कोकाटे, राजश्री बोडके, डी. ए. रबडे, सुषमा थोरात, राजेंद्र गांगुर्डे, मारुती डगळे, रामदास वारुंगसे आदी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन व कार्याचा परिचय श्रृती शिंदे, अभिरूप मुख्याध्यापक गौरव भिसे, कांबळे यांनी करून दिला. विद्यार्थ्यांना भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार केला. विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापनाचे कामकाज करून आलेले अनुभव कथन केले. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामकाज केले. प्राचार्य किशोर जाधव व सांस्कृतिक समितीचे प्रमुख पांडुरंग करपे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन अभिरूप शिक्षिका संघमित्रा रुपवते व सानिका पावसे यांनी तर आभार ज्येष्ठ शिक्षक एकनाथ खैरनार यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
जनता विद्यालय, डुबेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST