शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जानकी दादींच्या हस्ते नाशिकमध्ये झाले होते प्रधान केंद्रांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 00:23 IST

प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख राजयोगिती ब्रह्मकुमारी डॉ. जानकी दादी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत नाशकातील त्यांच्या २०१० मधील भेटीच्या आठवणी ब्रह्मकुमारी केंद्रावर जागविण्यात आल्या.

ठळक मुद्देप्रजापिता ब्रह्मकुमारी : नाशिककरांनी जागविल्या आठवणी

नाशिक : प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख राजयोगिती ब्रह्मकुमारी डॉ. जानकी दादी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत नाशकातील त्यांच्या २०१० मधील भेटीच्या आठवणी ब्रह्मकुमारी केंद्रावर जागविण्यात आल्या.१०४ वर्षे वयाच्या डॉ. जानकी दादी या केंद्राच्या मुख्य प्रशासकिय होत्याच शिवाय त्या स्वच्छतेसाठी सदीच्छा दूत देखील होत्या. माऊंट अबु येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या प्रेरणेने देशभरात विविध प्रकारचे कार्य चालते. नाशिकमध्ये देखील हजारो अनुयायी या संस्थेच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. नाशिकमध्ये त्यांच्या निधनाचे वृत्त कळाल्यानंतर शहरातील संचारबंदीमुळे काही कार्यक्रम एकत्रीत होऊ शकले नाही. मात्र, शहरातील ११ केंद्रांवर तीन दिवसीय ध्यान धारणेस प्रारंभ झाला.शरीर नश्वर असते. मात्र, आत्मा हा अन्यत्र अखंडीत कार्यासाठी पुढे जातो. दादींनी समाजासाठी खूप कार्य केले. परंतु शरीराने काम करताना येणाऱ्या अडथळ्यातून आत्मा मुक्त झाला आहे. त्यामुळे त्या अधिक व्यापक कार्य करू शकतील यासाठी प्रार्थना करण्यात येत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. नाशिकमधील मेरी रोड येथे संस्थेचे प्रधान कार्यालय २०१० मध्ये सुरू झाले. त्याचे उदघाटन दादींच्या हस्ते करण्यात आले होते. त्याच्या आठवणीही वासंती दिदी यांनी जागवल्या.डॉ. दादी जानकी यांच्याशी नाशिकमधील वासंतीदीदी यांच्यासह अन्य अनेकांचा स्नेह होताच. माउण्ट अबू येथे गेल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधता येत असे. अच्छाई आणि सच्चाई हे त्यांचे दोन गुण अनमोल होते अशा भावना नाशिक केंद्राच्या उपक्षेत्रीय संचालिका राजयोगीनी वासंतीदीदी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकDeathमृत्यू