शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत येथे जलशाहिरी परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 18:31 IST

  पिंपळगाव बसवंत : सन १९४२ ते १९५२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला केंद्रीय जल आयोग स्थापित करून सोननदी, हिराकुंड, दामोदर विकास खोरे स्थापितकडून अवघ्या तीन वर्षांत भारतीय वीज मंडळ, पाटबंधारे, नोकनायन, मत्स्यव्यवसाय यासह कृषी धोरणाची पायाभरणी केली असून, आजच्या राज्यकर्त्यांनी जल, जंगल, जमीन संवर्धन कामात नियोजन व धोरणांचाच दुष्काळ निर्माण केला आहे. पाणी संकटावर मात करण्यासाठी पाणी बचत-नियोजन ही लोकचळवळ बनावी, असे मत प्रा. अशोक सोनवणे यांनी लोकशाहीर दिनानिमित्त पाचव्या जलशाहिरी परिषदेत बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देलोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक व बी.पी. पाटील ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स पिंपळगांव बसवंत यांच्या वतीने बुधवारी पाचव्या जलशाहिरी परिषदेत प्रा. सोनवणे बोलत होते.

 पिंपळगाव बसवंत : सन १९४२ ते १९५२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला केंद्रीय जल आयोग स्थापित करून सोननदी, हिराकुंड, दामोदर विकास खोरे स्थापितकडून अवघ्या तीन वर्षांत भारतीय वीज मंडळ, पाटबंधारे, नोकनायन, मत्स्यव्यवसाय यासह कृषी धोरणाची पायाभरणी केली असून, आजच्या राज्यकर्त्यांनी जल, जंगल, जमीन संवर्धन कामात नियोजन व धोरणांचाच दुष्काळ निर्माण केला आहे. पाणी संकटावर मात करण्यासाठी पाणी बचत-नियोजन ही लोकचळवळ बनावी, असे मत प्रा. अशोक सोनवणे यांनी लोकशाहीर दिनानिमित्त पाचव्या जलशाहिरी परिषदेत बोलताना व्यक्त केले.महकवी वामनदादा कर्डक यांनी सामाजिक प्रबोधन चळवळीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून, बुद्ध आंबेडकरवादी गीतांसोबतच त्यांनी जल जंगल जमीन पर्यावरण महिला, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या जीवनावर लेखन केले आहे. त्यांच्या याच साहित्य शाहिरीला उजाळा देऊन त्यांचा सामाजिक न्यायाचा ध्यास असलेले विचार व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कवी गायक लेखक साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून पाणी हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आपल्या साहित्य प्रतिभेचा हाती घेऊन आपण लोक कलेतून लोक मनोरंजन व लोक मनोरंजनातून लोक जागृती करीत राहावे याकरिता कर्डक यांचा स्मृतिदिन ‘लोकशाहीर’ म्हणून साजरा करण्यात आला. सुफीकवी नुमान शेख अध्यक्षस्थानी होते.परिषदेस प्रा. दिनेश अनारसे, प्रा. किरण आरोटे, प्रा. कावेरी देवरे, प्रा. अमोल ताजने, प्रा. पगारे, प्रा. प्रकाश भंडारे, प्रा. सचिन बिडवे उपस्थित होते. कवी सोमनाथ गायकवाड, कवी भामरे व अभिषेक गांगुर्डे यांनी आपल्या जल, जंगल, जमीन-पर्यावरण संवर्धन काव्यगीते सादर केली. प्रास्ताविक प्रा. शरद दि. शेजवळ यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले.