शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभाचे काम १० महिन्यांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 15:57 IST

सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच गावाची तहान भागविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अर्धवट बांधलेल्या जलकुंभाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रीनव्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केली आहे.

ठळक मुद्देजलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांचेच...

सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच गावाची तहान भागविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अर्धवट बांधलेल्या जलकुंभाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रीनव्हिजन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुदेश खुळे यांनी केली आहे.१९८०-८१ साली तत्कालीन सरपंच शिवाजी निवृत्ती खुळे यांनी गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना राबविली. त्यासाठी १ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला.जलकुंभाला लागलेली गळती पाहून ४.५ वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच सुनीता पोपट सैद व कर्मचारी सुरेश काहंडळ यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून या जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले.त्यानंतर नवीन जलकुंभ मंजूर करायचा असल्याने शासनाने हा जलकुंभ निर्लेखित केला.तथापि, जलकुंभाचे काम सुरू झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत त्याचे बांधकाम पूर्ण होईल,अशी अपेक्षा असतांना गेल्या १० महिन्यांपासून ह्या जलकुंभाचे बांधकाम बंद आहे.ग्रामपंचायतने याबाबत संबंधित बांधकाम यंत्रणा पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे.मात्र अद्यापही काम सुरू होऊ शकलेले नाही.सध्या जुना जलकुंभ अतिशय जीर्ण झाला असून त्याद्वारेच गावाची तहान भागविली जाते.ग्रामपंचायतकडे नळपाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी पर्यायी जलकुंभ नसल्याने जुना जलकुंभ लगेच पाडल्यास गावचा पाणी पुरवठा बंद होईल.काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याबरोबरच हे काम चांगल्या व अनुभवी ठेकेदाराकडे देण्यात यावे,अशी मागणी सुदेश खुळे यांनी केली आहे.जलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांचेच...'मी सरपंच असतांना सन १९८०-८१ साली नळपाणी पुरवठा योजना राबविली.त्यावेळी ह्या जलकुंभाचे आयुष्य २५ वर्षांसाठी असेल असे सांगितले गेले.आजरोजी त्याला ४० वर्ष होत आहे.मात्र नवीन जलकुंभाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून जुन्या जलकुंभावरील भार कमी करावा.शिवाजी खुळे, योजना राबविणारे तत्कालीन सरपंचपाठपुरावा करूनही प्रतिसाद नाही'जलकुंभाचे काम बंद झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी ग्रामपंचायतने पत्रव्यवहार केला आहे.मात्र जिल्हा परिषदेकडून आम्हांला उत्तरही मिळाले नाही आणि जलकुंभाचे कामही सुरू झाले नाही.किशोर खुळे, माजी उपसरपंच 

टॅग्स :Waterपाणीsinnar-acसिन्नर