शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सिन्नर तालुक्यात जलकुंभ, हातपंप शुध्दीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 4:56 PM

सिन्नर:कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यात साथ रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या स्वच्छ भारत अभियान कक्षाच्यावतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा, खासगी व आश्रमशाळांचे पाण्याच्या टाक्या तसेच गावोगावच्या हातपंपांचे शुध्दीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देगावांतील 183 जलकुंभ, 182 शाळा-अंगणवाड्यांतील टाक्यांची स्वच्छता

सिन्नर:कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यात साथ रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या स्वच्छ भारत अभियान कक्षाच्यावतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा, खासगी व आश्रमशाळांचे पाण्याच्या टाक्या तसेच गावोगावच्या हातपंपांचे शुध्दीकरण करण्यात आले.या अंतर्गत तालुक्यातील 114 ग्र्रामपंचायतींमधील 183 पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांमार्फत स्वच्छ करण्यात आले. त्याचप्रमाणे शाळा, अंगणवाड्यांच्या 182 टाक्याही निवळीचे द्रावण टाकून स्वच्छ करण्यात आल्या.संपूर्ण जगातत सद्या कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाण्यापासून होणार्‍या साथ रोगांना आळा घालण्यासाठी स्वच्छ भारत अभियान कक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून जलकुंभ स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. नागरिकांना शुध्द व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे, जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता व संनियंत्रण व सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. तालुक्यात 1 जून पासून टाक्या स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. टाक्या स्वच्छ झाल्यानंतर या टाक्या पुन्हा भरुन नळावाटे पाणी सोडण्यात आले. हे पाणी भरण्यासही नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर पुर्णतः जलकुंभ स्वच्छ झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. हातपंप शुध्दीकरण करताना पंपाचे झाकण खोलून 6 इंचसाठी 300 ग्र्रॅम तर 4 इंचसाठी 150 ग्रॅम ब्लिचींग पावडरचे द्र्रावण टाकून शुध्दीकरण करण्यात आले. टाक्या आणि हातपंप शुध्दीकरणानंतर काही काळ त्यातील पाणी पिण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला होता. तालुक्यातील सर्व जलकुंभ आता स्वच्छ करण्यात आल्याने पावसाळ्यात पाण्यापासून होणार्‍या जलजन्य आजारांना आळा बसणार आहे. 

 

 

टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषण