शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जल परिषद करणार ११११ वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 00:17 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगेत जल परिषद मिशनतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जवळपास ११११ वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २१ दिवस ही मोहीम चालणार आहे.

ठळक मुद्देत्र्यंबक : शेवगापाडा येथून वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगेत जल परिषद मिशनतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जवळपास ११११ वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २१ दिवस ही मोहीम चालणार आहे.त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तसेच दिंडोरी तालुक्यासह तालुक्याच्या ग्रामीण व अतिदुर्गम भागांत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जल परिषद मिशनतर्फे ११११ वृक्षांचे रोपण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेअंतर्गत ५ जून ते २५ जुलैदरम्यान ग्रामस्थांच्या श्रमदानातून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेवगापाडा येथून शेवगा जातीच्या ११ वृक्षांसह पाच केशर आंब्यांची लागवड करून झाली. तालुक्यातील अनेक ठिकाणे ही पर्यटकांना पावसाळ्यात खुणावत असून, पर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. दिवसेंदिवस जंगलांचा होणारा ऱ्हास ओळखून जल परिषद मित्र परिवाराने यावर्षी मिशन १०१ वनराई बंधारा, पशु-पक्षी संवर्धन तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ११११ वृक्षांचे वृक्षारोपण करण्याची मोहीम हाती घेतली. जल परिषद मित्र परिवाराचे हिरामण शेवरे, एकनाथ भोये, देवीदास कामडी, नितीन गांगुर्डे, नवनाथ गांगुर्डे, रतन चौधरी, योगेश महाले, देवचंद महाले, पोपट महाले, अनिल बोरसे, संजय गवळी, रतन बागुल, अशोक तांदळे, हुशार हिरकुड, केशव पवार, हिरामण चौधरी, नामदेव पाडवी, नेताजी गावित, मनीषा घांगळे, विठ्ठल मौळे, प्रकाश पवार, सीताराम पवार, गणेश सातपुते, प्रल्हाद पवार, ज्ञानेश्वर गावित आदींच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.महिलांच्या हस्ते मोहिमेस प्रारंभजल परिषद मित्र परिवाराने ११११ वृक्षांचे ५० दिवसांत वृक्षारोपण करण्याचा संकल्प ठेवला आहे. शेवगापाडा येथून या मोहिमेचा महिलांच्या हस्ते केशर, आंबा वृक्षाचे रोपण करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी झाडाचे पूजन व औक्षण करण्यात आले.दिवसेंदिवस ग्रामीण भागातील चोरट्या जंगलतोडीमुळे तसेच शहरी भागातील वाढत्या औद्योगिकरणामुळे झाड, जंगलांचा ऱ्हास होत आहे. जल परिषद मित्र परिवाराने वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे.- पोपट महाले, जलमित्र. 

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरSocialसामाजिक