शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

जैन सोशल ग्रुप महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर

By admin | Updated: April 26, 2016 23:57 IST

पदग्रहण सोहळा : ग्रुप अध्यक्षपदी विजय कोठारी, सचिवपदी सचिन शाह

नाशिक : जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजनच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा व पदग्रहण सोहळा नुकताच कालिदास कलामंदिर येथे उत्साहात पार पडला. या समारंभात बोलताना जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष पंकज संघवी यांनी सांगितले की, जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजन हा भारतातील सर्व विभागात अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्र विभागाचे कार्यक्रम उल्लेखनीय आहेत. दोन दिवसीय समारंभात महाराष्ट्र रिजनचा बक्षीस वितरण सोहळा, ज्ञानवर्धन कार्यशाळा व पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानवर्धन कार्यशाळेत बालकृष्ण जोशी, ऊर्जा पाटील, राज मुच्छाल, प्रांतिक पाणीग्रही, बिरेन शाह यांनी महाराष्ट्र व कर्नाटकातील ग्रुपच्या ३०० पदाधिकाऱ्यांना ग्रुपच्या कार्यपद्धती, प्रत्येकाची कर्तव्ये, इमेज बिल्डिंग आदि विषयांवर मार्गदर्शन केले. पंकजा बडेरा यांनी सूत्रसंचालन केले. या जैन सोशल गु्रप युवा फोरमला बेस्ट सचिव व जैन सोशल ग्रुप मिडटाऊन ग्रुपला बेस्ट ग्रुपचा पुरस्कार मिळाला. नाशिकचे विजय कोठारी यांनी अध्यक्ष म्हणून व सचिन शाह सचिव म्हणून शपथ घेतली. प्रादेशिक पदाधिकाऱ्यांनीही पदाची शपथ घेतली. नाशिकच्या जयश्री धाडीवाल आणि सरला पटणी यांनी जनसंपर्क म्हणून शपथ घेतली. फेडरेशनचे माजी प्रमुख शरद शाह यांनी पदाची शपथ दिली. प्रमुख पाहुणे म्हणून इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष पंकज संघवी, माजी अध्यक्ष शरद शाह, डॉ. रणजित गांधी, फेडरेशनचे प्रमुख सचिव मणिलाल शाह, पीआरओ बिरेन शाह आणि फेडरेशनचे संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)