शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

धोका पत्करून परप्रांतीयांचा ‘जय महाराष्ट्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:45 IST

नाशिक : मुंबईसह अन्य भागांतून पायपीट करीत मूळ गावी जाणाऱ्यांना ट्रकचालकांनी हात दिला आणि शनिवारी (दि.९) हजारो परप्रांतीयांनी त्यातून प्रवास करीत महाराष्ट्र’चा निरोप घेतला. अर्थात, ट्रकमध्ये आणि टपावर बसून अत्यंत धोकादायक प्रवास सुरू असताना पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.

नाशिक : मुंबईसह अन्य भागांतून पायपीट करीत मूळ गावी जाणाऱ्यांना ट्रकचालकांनी हात दिला आणि शनिवारी (दि.९) हजारो परप्रांतीयांनी त्यातून प्रवास करीत महाराष्ट्र’चा निरोप घेतला. अर्थात, ट्रकमध्ये आणि टपावर बसून अत्यंत धोकादायक प्रवास सुरू असताना पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष करून एकाच ट्रकमध्ये खच्चून सर्व जण बसून प्रवास करीत होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग गावागावात पोहोचण्याची भीती आहे.  लॉकडाउन आणि संचारबंदी वाढत गेली आणि ती वाढण्याची शक्यता अधिक असल्याने रोजगाराची चिंता तर आहेच, परंतु कोरोनामुळे आता घराकडे जाण्याची ओढ वाढली आहे. मात्र गावाकडे जाण्यासाठी बस आणि रेल्वे अशी कोणतीही साधने नसल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, शहापूर याभागातून शेकडो परप्रांतीय नागरिक पायपीट करीत जात आहेत. उन्हा तान्हात लेकराबाळांसह जत्थ्याने जाणारे हे नागरिक नाशिकमार्गे जाताना दुपारी काही वेळ सावलीत विश्रांती घेतात आणि परत गावाकडे जातात, तर काहीजण रणरणत्या उन्हात जाण्याऐवजी रात्रीच्या वेळी प्रवास करतात. सुरुवातीला पोलिसांनी त्यांना अडविले मात्र आता सर्रास ते गावाकडे जात असतात. औरंगाबाद येथील रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या मजुरांचा मृत्यू झाल्यानंतर तर आता यंत्रणा अशा धोकादायक प्रवासापेक्षा सरळमार्गाने गावी जात असतील तर बरे अशा भूमिकेप्रत आली आहे. शनिवारी (दि.९) त्याचे प्रत्यंतर आले.मुंबईकडून भल्या पहाटे रिक्षा आणि सायकल तसेच पायपीट करीत निघालेले मजूर इगतपुरीपर्यंत येत असताना अक्षरक्ष: वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईकडून येणारी अनेक वाहने त्या लोंढ्यांमुळे अडकली, तर दुसरीकडे या नागरिकांनी मालट्रकने प्रवास करण्याची तयारी दर्शविल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडथळे आणले नाही.मालट्रकच्या टपावर आणि मागेदेखील अत्यंत कोंबून बसलेले हे नागरिक धोकादायक पद्धतीने प्रवास करीत होते. त्यात मास्क तर कोणाकडे नव्हतेच, शिवाय फिजिकल डिस्टन्सिंग नव्हते. काही जण तर टपावर बसून प्रवास करीत होते. त्यामुळे अत्यंत धोकादायक चित्र होते. नाशिक शहरात द्वारका भागातदेखील सर्रास ट्रकमध्ये बसवून नागरिकांना नेले जात होते.--------परप्रांतीय सुसाट, निवारागृह रितेलॉकडाउननंतर जिल्ह्याच्या सीमासिल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यात आणि शहरात येणाºया मजुरांना पकडून निवारागृहात पाठविले जात होते. परंतु सुमारे दोन हजार इतकी संख्या झाल्यानंतर पोलिसांनी मजुरांना अडविले नाही की जिल्हा प्रशासनाने त्यांना निवारागृहात घेतलेले नाही.

टॅग्स :Nashikनाशिक