नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त विविध खालशांच्या वतीने धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. जय गुरुदेव बाबा महाराज आणि त्यांचे शिष्य उमाकांत महाराज शाकाहाराचा संदेश व गो-रक्षा अभियान राबविले असून, भक्त परिवाराकडून ठिकठिकाणी प्रचार सुरू केला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जय गुरुदेव यांचे शिष्य उमाकांत महाराज यांच्या आखाड्यात असून, येथे सत्संग सुरू आहे. तसेच शिष्य आणि भक्त परिवाराकडून मांसाहार, दारू सोडा, गो मातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहा, बाहेर जाताना महिलांनी दागिने घालू नका आदि संदेश देणारी पत्रके वाटण्यात येत आहेत. विशेष म्हणजे गायीला राष्ट्रीय पशु घोषित करा, या मागणीसाठी जय गुरुदेव सेवा मंडळातर्फे नागरिकांकडून विनंती अर्ज भरून घेण्यात येत असून, सदर अर्ज पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहेत. यासाठी अर्जावर नाव, दूरध्वनी मोबाइल क्रमांक व स्वाक्षरी घेण्यात येत आहे. यासाठी तपोवन, साधुग्राम, रामकुंड, गोदाघाट आदि ठिकाणी तसेच शहरातील चौकांमध्ये सदर अभियान राबविण्यात आले. (प्रतिनिधी)
जय गुरुदेव बाबाजींचा शाकाहारी राहण्याचा ठिकठिकाणी प्रचार
By admin | Updated: September 4, 2015 00:32 IST