शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

जय भवानी जय शिवाजीचा जयघोष

By admin | Updated: March 10, 2015 23:52 IST

शिवजयंती : शहर परिसरात विविध कार्यक्रम

नाशिक : शहर व परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. विविध ठिकाणी सुरु असलेल्या पोवाड्यांनी वातावरणात वीरश्री संचारली होती. आडगाव मारुती मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन जयंत दिंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळापूजन निवृत्ती मते, मधुकर मते, मल्हारी मते, बबनराव माळोदे यांनी केले. यावेळी सुरेश मते, संजय शिंदे, सुनील जाधव, जालिंदर शिंदे, कैलास माळोदे, बालाजी माळोदे, दत्तू शिंदे, अरुण मते, किरण लभडे, गोकुळ शिंदे, सुदाम दुशिंग, संदीप पोटे, पोपट लभडे, अभय माळोदे, रामभाऊ जाधव, प्रवीण हांडोरे, देवा कडभाने, विनोद हिंदे, बंडू लभडे, सोनू मते, प्रकाश मते, वैभव मते, ज्ञानेश्वर लोहकरे आदी उपस्थित होते. प्रा जावेद शेख यांचे व्याख्यान झाले. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. सूत्रसंचालन अभय माळोदे यांनी केले. आभार निवृत्ती मते यांनी मानले.सिडको राजरत्ननगर येथील श्री गुुरुदत्त मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष मनोज हिरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच महिला दिनाचे औचित्य साधून परिसरातील घरसांभाळून काम करणाऱ्या कष्टकरी महिलांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बबन गडाख यांनी केले, तर रंधे यांनी आभार मानले. नीलेश ठाकरे, रेखा लिंगायत, मनीषा हिरे, सुभाष बोरसे, रमेश सौंदाणे, दीपक खैरनार आदिंनी कार्र्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. उपनगरउपनगर, गांधीनगर, आगर टाकळी परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच आगर टाकळी परिसरासह शिवाजीनगर, आंबेडकरनगर, गांधीनगर, उपनगर भागातील विविध लहान-मोठ्या कॉलनींमध्ये भगवे ध्वज, पताका लावून भगवेमय वातावरण करण्यात आले होते. परिसरातील अनेक मित्रमंडळांनी छत्रपती शिवरायांचे भव्य कटाउट्स उभारून आकर्षक सजावटी बरोबरच नेत्रदीपक रोषणाईदेखील केली होती. रात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करीत प्रतिमापूजन करण्यात आले. विविध मंंडळांच्या वतीने शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी झालेल्या जयंती उत्सवात पूर्व प्रभाग सभापती प्रा. कुणाल वाघ, नगरसेवक राहुल दिवे, मेघा साळवे, सुमनताई ओहोळ, रवि पगारे, विजय ओहोळ, अनिल ताजनपुरे, नीलेश चहाणे आदिंसह अनेकांनी प्रतिमापूजन केले.