शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
3
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
4
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
5
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
6
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
7
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
8
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
9
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
10
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
11
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
12
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
13
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
14
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
15
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
16
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
17
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
18
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
19
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
20
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

जय बाबाजी भक्त परिवार करणार सव्वाकोटी तास श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 23:02 IST

पिंपळगाव बसवंत : गाव, शहर, मंदिर, रस्ते, स्मशानभूमी, गल्ली स्वच्छ करण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने पुढाकार घेतला असून त्यासाठी १ कोटी २५ लाख ३४ हजार ५६७ तास श्रमदान केले जाणार असल्याची माहिती परिवारामार्फत देण्यात आली.

ठळक मुद्देश्रमेव जयते : श्रमप्रतिष्ठा वाढविण्यासाठी उपक्रम

पिंपळगाव बसवंत : गाव, शहर, मंदिर, रस्ते, स्मशानभूमी, गल्ली स्वच्छ करण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने पुढाकार घेतला असून त्यासाठी १ कोटी २५ लाख ३४ हजार ५६७ तास श्रमदान केले जाणार असल्याची माहिती परिवारामार्फत देण्यात आली.

निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी समाज कल्याणासाठी १९६४ साली श्रमदान निष्काम सेवा ही परंपरा सुरू केली. त्या अनुषंगाने बाबाजींचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी या परंपरेत लाखो भक्तांना सहभागी करीत ह्यश्रमेव जयतेह्ण या तत्त्वानुसार श्रमप्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि कोविड संसर्ग टाळण्यासाठी सव्वाकोटी तास श्रमदान करण्याचे ठरवले आहे. यासाठी निफाड तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवाराने यात सहभागी होऊन तालुक्यातील शेकडो मंदिर परिसर स्वच्छ करीत या श्रमदान प्रक्रियेला सुरुवात केली.प्रारंभी पिंपळगाव बसवंत येथील शिवाजी नगर परिसरातील मंदिरातून या श्रमदानाला सुरुवात झाली. या श्रमदानाचे उद्घाटन पिंपळगाव बसवंत शहराच्या सरपंच अलका बनकर व ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.इन्फोश्रमदान सप्ताहाचे आयोजनश्रमदान सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किमान ३० तास श्रमदान नियोजित ठिकाणी करायचे आहे. श्रमदान करणाऱ्या व्यक्तीला श्रमदान कार्ड देण्यात येईल. श्रमदानाची तारीख, ठिकाण व वेळ नोंद केली जाईल. तसेच श्रमदानाची व्हिडिओ शूटिंग केली जाईल. दर महिन्यातून रविवार ते रविवार एक श्रमदान सप्ताह राहील. दरम्यान, शुभारंभप्रसंगी रामराव डेरे, दत्तू मेधने, संजय चव्हाण, सुरेश सरोदे, भागीरथ भोसले, इंद्रपाल चव्हाण, बाळासाहेब आंबेकर, नाना कुमावत, राजाराम भोसले, प्रशांत शिंदे, पुंडलिक कुयटे, छाया कुयटे, सुनीता मोरे, सुमन मोरे आदींसह शेकडो भाविक उपस्थित होते. 

टॅग्स :Socialसामाजिकtalukaतालुका