निकवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जगदीश वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 10:30 PM2020-08-23T22:30:22+5:302020-08-24T00:14:08+5:30

डांगसौंदाणे : बागलाण तालुक्यातील निकवेल येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जगदिश वाघ यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Jagdish Wagh as Deputy Panch of Nikvel Gram Panchayat | निकवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जगदीश वाघ

निकवेलचे उपसरपंच जगदीश वाघ यांच्या सत्कारप्रसंगी मुरलीधर वाघ, रामचंद्र मोरे, तात्या मोरे, इंदूबाई सोनवणे, अनिता वाघ, सरला सोनवणे आदी.

Next
ठळक मुद्देनिवडणुक निर्णय अधिकारी प्रमिला पवार होत्या.

डांगसौंदाणे : बागलाण तालुक्यातील निकवेल येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जगदिश वाघ यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मुरलीधर वाघ यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंचपदी निवड करण्यासाठी सरपंच चित्रा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी जगदिश वाघ यांच्या नावावर एकमत झाले. वाघ यांना सुचक म्हणून सरला सोनवणे तर अनुमोदक म्हणून तात्या मोरे यांनी स्वाक्षरी केली.
निवडणुक निर्णय अधिकारी प्रमिला पवार होत्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर वाघ, रामचंद्र मोरे, तात्या मोरे, इंदूबाई सोनवणे, आनिता वाघ, सरला सोनवणे, निलेश वाघ उपस्थित होते.

Web Title: Jagdish Wagh as Deputy Panch of Nikvel Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.