आवर्तनानुसार अध्यक्षपदाचा प्रकाश शिरसाठ आणि उपाध्यक्षपदाचा रामदास बचछाव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. तालुका सहायक सहकारी अधिकारी दिलीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. दोन्ही पदांसाठी एक एक अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. यावेळी सोसायटीचे संचालक विलास आहिरे, प्रकाश शिरसाठ, प्रताप ठाकरे, रघुनाथ गुंजाळ, योगेश गुंजाळ, धर्मा पवार, तानाजी आहेर, रामदास बचछाव, जिजाबाई शिरसाठ, रमेश खरे आदींसह सभासद उपस्थित होते.
साईनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 01:15 IST