शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हल्ली सच्चा माणूस मिळणे कठीण :  तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:29 IST

सामाजिक जीवनात काम करताना सहजासहजी लोकमान्यता मिळत नाही, अशा परिस्थितीत कामाचा ध्यास आणि अविरत सेवा केल्यानंतरच खरी ओळख मिळते. बाळासाहेब गामणे यांनी गेली ५० वर्षे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सेवेमुळे त्यांनी आपले स्थान निर्माण केल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.

नाशिक : सामाजिक जीवनात काम करताना सहजासहजी लोकमान्यता मिळत नाही, अशा परिस्थितीत कामाचा ध्यास आणि अविरत सेवा केल्यानंतरच खरी ओळख मिळते. बाळासाहेब गामणे यांनी गेली ५० वर्षे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सेवेमुळे त्यांनी आपले स्थान निर्माण केल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. नागरी सत्कार समितीच्या वतीने बाळासाहेब गामणे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी लहाने बोेलत होते. श्रद्धा लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी प.पू. महामंडलेश्वर श्रीश्री शांतिगिरी महाराज, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जयवंत जाधव, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, सुधीर तांबे, राजाभाऊ वाजे आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाळासाहेब गामणे, मीरा गामणे यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तात्याराव लहाने म्हणाले, ३५ वर्षेे मी डोळंवर निष्ठा ठेवून काम केल्यानंतर डॉक्टर म्हणून मला ओळख मिळाली. त्याप्रमाणे बाळासाहेब गामणे यांनी वयाच्या ५० वर्षांपर्यंत समाजासाठी केलेले काम आणि दिलेले योगदान यामुळे त्यांना लोकमित्र म्हणून ओळख मिळाली. राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळेच या क्षेत्रातील मान्यवर येथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. आधुनिक काळात सच्चा माणूस मिळणे कठीण आहे. अशा स्थितीत बाळासाहेब गामणे यांच्यासारख्या सच्चा माणसाचा हा सत्कार नवीन पिढीसाठी आदर्श असल्याचे तात्याराव म्हणाले.  याप्रसंगी सरपंच पोपटराव पवार, जि.प. अध्यक्ष शीतल सांगळे, शाहू खैरे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, प्रकाश आंधळे यांनी विचार मांडले प्रास्ताविक शिवाजी मानकर यांनी केले. व्ही.एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी आभार मानले. यावेळी सत्कार समितीचे अध्यक्ष राधाकिसन चांडक, डॉ. डी.एल. कराड, आदिवासी आयुक्त अर्जुन कुलकर्णी, व्ही.एन. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी मंत्री शोभा बच्छाव, पंढरीनाथ थोरे, माधवराव पाटील, नितीन भोसले, पुंजाभाऊ सांगळे आदी उपस्थित होते. गावापासून ते मंत्रालयापर्यंत सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या व्यक्ती निवडून आल्यास प्रत्येक गाव स्वावलंबी होईल. राजकारण फक्त निवडणुकांपर्यंत मर्यादित असावे. प्रत्येक शहरामध्ये ६० टक्के झोपडपट्ट्या वसल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण किंवा शहरी भागात पर्यावरण, पाणी, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. या स्वरूपाचे कार्य गामणे यांनी उभे केले आहे़ - पोपटराव पवार, सरपंच, हिवरगाव

टॅग्स :Nashikनाशिक