दु:खातून बाहेर पडण्यासाठी लागते निमित्त : डॉ. मोहन आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 01:56 AM2022-05-14T01:56:07+5:302022-05-14T01:56:31+5:30

समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे ज्येष्ठ कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले.

It takes time to get out of grief. Mohan Agashe | दु:खातून बाहेर पडण्यासाठी लागते निमित्त : डॉ. मोहन आगाशे

दु:खातून बाहेर पडण्यासाठी लागते निमित्त : डॉ. मोहन आगाशे

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘दिठी’ चित्रपटाला नाशिककरांचा प्रतिसाद

नाशिक : समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे ज्येष्ठ कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले.

 

नाशिक सायकियाट्रिक सोसायटी आणि आय.पी.एच. व मनतरंग फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिठी’ या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण शुक्रवारी आयएमएच्या सभागृहात करण्यात आले. या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणारे कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना जीवनातील उलथापालथीत बहुतांश माणसे मृत्यू हे अंतिम सत्य असल्याचेच विसरून जातात. त्यामुळेच आपल्या कुटुंबातील जिवलगाचा मृत्यू त्यांना सहन होत नाही. त्या दु:खातच ते स्वत:ला बुडवून घेतात. मृत्यूचे अंतिम सत्य आणि जवळच्या व्यक्तीला गमावल्याचे दु:ख हे प्रत्येकाच्याच वाट्याला येते. मात्र, त्यातून बाहेर पडण्यासाठी, त्यातून मोकळे होण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी निमित्त हवे असते. तसे जर झाले तरच आपण एका नव्या दिशेने चालू लागतो. त्यामुळे असा आघात झालेल्या परिघातील प्रत्येकाने तशा स्वरूपाचे प्रयत्न करून आघातग्रस्ताला लवकरात लवकर त्या दु:खातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला हवा,असेही आगाशे यांनी नमूद केले. केवळ बुद्धिमतेच्या जोरावर नव्हे, तर अनुभवातून आलेल्या शहाणपणावरही ते दु:ख पचवण्याचे भान देता येते, असेही डॉ. आगाशे यांनी सांगितले. दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासी आले’ या लघुकथेवर आधारित असलेला आणि सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दिठी’ या चित्रपटातून तेच वास्तव मांडण्यात आले आहे. चित्रपटाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला.

 

Web Title: It takes time to get out of grief. Mohan Agashe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.