शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे कर्करोगावर मात शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:29 IST

भारतात स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे पहिल्या टप्प्यावरच निदान होणे आता सहज शक्य आहे. जेनेटिक तपासण्या आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. जगभरात विविध रोगांवर होणाºया संशोधनापैकी २५ टक्केपेक्षा अधिक संशोधन केवळ कर्करोगावर होत आहे, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान अन् संशोधनामुळे कर्करोगावर मात करणे सहज शक्य असल्याचा सूर राज्यस्तरीय चौथ्या अ‍ॅँमो परिषदेत उमटला.

ठळक मुद्देतज्ज्ञांच्या परिषदेत उमटला सूरराज्यस्तरीय अँमो परिषद

नाशिक : भारतात स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे पहिल्या टप्प्यावरच निदान होणे आता सहज शक्य आहे. जेनेटिक तपासण्या आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. जगभरात विविध रोगांवर होणाºया संशोधनापैकी २५ टक्केपेक्षा अधिक संशोधन केवळ कर्करोगावर होत आहे, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान अन् संशोधनामुळे कर्करोगावर मात करणे सहज शक्य असल्याचा सूर राज्यस्तरीय चौथ्या अ‍ॅँमो परिषदेत उमटला.शहरात दोनदिवसीय चौथ्या राज्यस्तरीय अँमो परिषदेला शनिवारी (दि.११) प्रारंभ करण्यात आला. मेडिकल आँकॉलॉजीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती राज्यभरातील क र्करोगतज्ज्ञांना व्हावी, या उद्देशाने असोसिएशन आॅफ महाराष्ट्र मेडिकल आँकॉलॉजीस्टच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी परिषदेचा समारोप होणार आहे. या परिषदेसाठी नाशिक विभागासह राज्यभरातून कर्करोग तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. उद्घाटनाप्रसंगी डॉ. पूर्वेश पारीख, डॉ. गोविंद बाबू, डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. चंद्रशेखर पेठे आदी उपस्थित होते.केमोथेरपी करताना रु ग्णांना होणारा त्रास ८० टक्के कमी करण्यास वैद्यकशास्त्राला यश आले आहे. त्यामुळे कर्करोग रु ग्ण पूर्ण कोर्स करून आता सामान्य आयुष्यही जगत असल्याचे डॉ. शैलेंद्र बोंदार्डे यांनी सांगितले.दरम्यान, स्तनाच्या कर्करोगावर परिसंवाद, विविध प्रकारच्या हार्मोनल स्तन कर्करोगावर मार्गदर्शन, फुफ्फुसाचा कर्करोग व व्यवस्थापन, उपचारांमधील क्रमवारी, प्रोस्टेट कॅन्सरमध्ये योग्य रु ग्णावर योग्य वेळी उपचार, किडनी कॅन्सरमधील टीकेआय थेरपी अशा विविध विषयांवर यावेळी मंथन घडून आले.जगण्याची शाश्वती २५ टक्क्यांनी वाढलीस्तनाच्या कर्करोगासाठी स्क्र ीनिंग, कर्करोगाचा धोका वेळीच ओळखण्यासाठीचे तंत्रज्ञान यावर परिषदेत चर्चा करण्यात आली. यावेळी स्तनाच्या कर्करोगाच्या अवघड प्रकरणामध्ये शेवटच्या टप्प्यातील कर्करोगावर उपचार करताना रु ग्ण जगण्याची शाश्वती पूर्वीपेक्षा २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे यावेळी तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यcancerकर्करोग