शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गावी जाण्यासाठी मजुरांना तहसीलदारांकडे नोंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:29 IST

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यास त्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यासत्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली.नाशिक मनपा आणि मालेगाव मनपा हद्द वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना त्या-त्या तालुक्यांचे तहसीलदारांकडे आॅनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. राज्य शासनाकडून परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने नावनोंदणी केलेल्या परराज्यातील नागरिकांनाच या विशेष सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांकडे नोंदणी करणे अपेक्षित आहे, असे आवाहन मुंडावरे यांनी केले आहे.आतापर्यंत रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून परप्रांतीय नागरिकांना आपल्या राज्यातील सीमारेषेपर्यंत सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांत अजूनही अनेक परप्रांतीयांनी गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यांनी नावे नोंदणीला सुरुवातही केलेली आहे. ज्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही त्यांनी आपल्या तालुक्यातच नोंदणी करण्यासाठी तहसीलदारांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नोंदणी झालेल्या आणि ज्यांच्यासाठी रेल्वे उपलब्ध झाली आहे अशा तालुक्यांतून परप्रांतीय प्रवाशांना बसेसच्या माध्यमातून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोहोचविले जाते.----------------------------------एसएमएसद्वारे माहितीसदर संपूर्ण प्रक्रिया ही ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या आणि आता आपल्या गावी जाऊ इच्छिणाºया परप्रांतीय प्रवाशांसाठी असून त्यांनी सदर प्रक्रिया जाणून घेऊन तहसीलदारांकडे आपल्या नावाची आॅनलाइन नोंदणी करणे अपेक्षित आहे. नोंदणी झालेल्यांना त्यांच्या परतीची व्यवस्था झाल्यानंतर त्यांना त्याची माहिती भ्रमणध्वनीवरून एसएमएसद्वारे दिली जाते. ज्यादिवशी रेल्वे उपलब्ध होईल, त्यानुसार त्यांना बसद्वारे स्टेशनवर आणि तेथून विशेष रेल्वेने आपल्या राज्यात परत जाण्याची सुविधा दिली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक