नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विशिष्ट भागातच हजेरी लावणार्या अवकाळी पावसामुळे होणार्या नुकसानीचा अंदाज बांधणेही यंत्रणेला कठीण झाले असून, एका ठिकाणचा पंचनामा पूर्ण होत नाही तोच दुसर्या दिवशी पुन्हा पावसामुळे नुकसानीत भर पडत असल्याने त्याचा परिणाम भरपाई देण्यावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ातील ग्रामीण भागात मार्च व एप्रिल महिन्यांत सातत्याने अवकाळी पावसाने हजेरी कायम ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले. महसूल व कृषी खात्याने नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविला व त्यावर शासनाने नुकसानभरपाईची रक्कमही पाठविली. परंतु त्यानंतरही पावसाचे थैमान कायम राहिले आहे. विशेष करून बागलाण तालुक्यातील विशिष्ट भागात तर दररोजच पाऊस हजेरी लावत असल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश असल्याने यंत्रणेची पाठ फिरत नाही तोच पुन्हा पाऊस पडत आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. बुधवारी सायंकाळी जिल्ात सर्वदूर झालेल्या पावसामुळेही त्यात आता भर पडली आहे. सर्वाधिक पाऊस चांदवड तालुक्यात नोंदविला गेला असून, दोन ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे. चांदवडला १२, सिन्नर व इगतपुरी येथे प्रत्येकी ४, निफाडला २ व नाशिकला १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे.
े फेरपंचनाम्यांमुळे नुकसानीचा अंदाज कठीण
By admin | Updated: May 8, 2014 21:31 IST