शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

महापालिकेने लादलेल्या  करवाढीचा विषय थेट विधानसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:25 IST

महापालिकेने लादलेल्या करवाढीच्या मुद्द्याने पुन्हा एकदा उचल घेतली असून, शहरातील दोन आमदारांनी यासंदर्भात विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडला असून, अर्धा तास चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त आहे.

नाशिक : महापालिकेने लादलेल्या करवाढीच्या मुद्द्याने पुन्हा एकदा उचल घेतली असून, शहरातील दोन आमदारांनी यासंदर्भात विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडला असून, अर्धा तास चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात पुन्हा एकदा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ते बैठक बोलविणार आहेत. याशिवाय महासभेत करवाढीचा मुद्दा उपस्थित होणार आहे. आचारसंहितेत स्थगित झालेली महासभा पुन्हा घेण्याची मागणी विरोधकांनी केली असून, त्यामुळे या महिन्यात करवाढीचा मुद्दा गाजणार आहे.  महापालिकेच्या महासभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुचवलेली करवाढ सत्तारूढ भाजपाने मान्य करून घरगुतीसाठी ३२ टक्के तर बिगर घरगुतीसाठी ६२ तर औद्योगिक क्षेत्रासाठी ८४ टक्के करण्याचे ठरविले होते. मात्र हा विषय अंगलट आल्यानंतर महासभेचा ठराव करताना सरसकट १८ टक्के दरवाढ केली होती. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च महिन्याच्या अखेरीस वार्षिक भाडेमूल्य वाढविलेच शिवाय मोकळ्या जागांवरदेखील करआकारणी लागू केल्याने  शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.शेतीवर कर नसल्याचा निर्वाळा आयुक्तांनी दिला असला तरी आता नव्या डीपीनुसार शेती क्षेत्र पिवळ्या पट्ट्यात येत असल्याने आंदोलने झाली. त्यामुळे करवाढीच्या संदर्भात विशेष महासभा घेण्यात आली. विधान परिषद निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असताना महासभेने करवाढ (वार्षिक भाडे मूल्य तसेच खुल्या जागांवरील करआकारणी) स्थगित करून त्यासंदर्भातील निर्णय आचारसंहितेनंतर घेण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता स्थानिक स्वराज संस्था पाठोपाठ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्याने आता करवाढ या विषयाने पुन्हा उचल खाल्ली आहे.करवाढीस विरोध करण्यासाठी शहरातील दोन आमदारांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यासाठी पत्रे दिली आहेत. या विषयावर अर्धा तास चर्चा करण्याची मागणी दोन्ही भाजपा आमदारांनी केली आहे. तर सोमवारी (दि.२) नाशिक दौºयावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विषयाबाबत गाºहाणी मांडण्यात आल्याचे वृत्त असून, त्या अनुषंगाने त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यास सांगितले असल्याचे सांगण्यात आले. महाजन यांना यापूर्वीदेखील आयुक्तांनी महासभेच्या अगोदरच हा विषय मार्गी काढण्यासाठी बैठक घेण्यास सांगितले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका