शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

तपोवनात डोक्यात दगड टाकून इसमाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 1:09 PM

रामसृष्टी उद्यानात असलेल्या एका राहूटीजवळ संतोषचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देहल्लेखोरांच्या शोधात गुन्हे शोध पथक रवाना मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश

नाशिक : येथील तपोवन या धार्र्मिक पर्यटनस्थळावर एका फिरस्त्या इसमाच्या डोक्यात दगड टाकून अज्ञात संशयितांकडून हत्त्या करण्यात आल्याचे सोमवारी (दि.३) सकाळी उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. साधुग्राम प्रवेशद्वारापासून काही अंतरांवर झाडांमध्ये मृतदेह आढळून आला.याबाबत मिळालेली माहिती अशी, आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवनात एका ४० वर्षीय युवकाच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आल्याचे सकाळी या भागात काही नागरिकांना आढळून आले. नागरिकांनी अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी तत्काळ आडगाव पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले असून मुळ हरसूल गावातील रहिवासी असलेला संतोष रामकृष्ण पवार असे मयत इसमाचे नाव असल्याचे समोर आले आहे. येथील झाडांमध्ये असलेल्या एका राहूटीजवळ संतोषचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आले तसेच तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने वर्मी घाव लागून त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले. रविवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा घडला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. याबाबत परिसरात माहिती घेतली जात असून अज्ञात हल्लेखोरांच्या शोधात गुन्हे शोध पथक रवाना झाले आहे. एका फिरस्ती करणाऱ्या इसमाच्या हत्त्या करण्यामागील कारण नेमके काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनTapovanतपोवन