शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आठ वर्षांपासून रखडली जलसिंचन योजनेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:36 IST

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातील उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाला असून, तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी मंजूर असलेली कामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. सदर कामे रखडण्यामागे घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाहणी दौरा करून, अधिकारी व ठेकेदारांची कानउघाडणी करून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा संताप : योजनेत घोटाळा झाल्याचा संशय

तुकाराम रोकडेदेवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरातील उपसा जलसिंचन योजनेचा बोजवारा उडाला असून, तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी मंजूर असलेली कामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. सदर कामे रखडण्यामागे घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाहणी दौरा करून, अधिकारी व ठेकेदारांची कानउघाडणी करून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले.सन २०१३-१४ साली मंजुरी मिळालेल्या देवगांव परिसरातील सामुंडी, खरोली, आळवंड, डहाळेवाडी, आव्हाटे, चंद्राची मेंट आणि देवगांव आदी गावांतील जलसिंचन योजना पूर्ण झाली नसून, संबंधित योजनेची कामे बाळगली असून, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, बोजवारा उडालेल्या कामांचा ठेकेदारांनी बिल काढून काम पूर्ण दाखविल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात जलसंधारण प्रकल्पांतर्गत जलसिंचन योजनेचे २२ कोटी रुपयांची कामे सन २०१३-१४ साली मंजूर झाली होती. मात्र, आजतागायत कोणत्याही गावात काम पूर्ण न झाल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, देवगांव परिसरातील कामांचा आढावा दौरा करून अधिकाऱ्यांना जलसिंचनाची कामे तत्काळ पूर्णत्वास नेण्याचे आदेश दिले, तसेच ठेकेदारांची कानउघाडणी करून शेतकऱ्यांची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सोनल पाटील, उपकार्यकारी अभियंता सचिन धूम, संपत सकाळे, काँग्रेस नेते गोपाळ लहांगे, काँग्रेस युवक नेते निकलेश दोंदे, लक्ष्मण खाडे, सुनील बांगरे, आमदारांचे स्वीय सहायक जयराम मोंढे, चंद्राचीमेटचे सरपंच राजू चंद्रे, संतोष निरगुडे, ठेकेदार व शेतकरी उपस्थित होते.कोट...मागील नागपूरच्या अधिवेशनात सदर प्रलंबित असलेल्या जलसिंचन योजना पूर्ण करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून दिरंगाई होत असलेल्या कामाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला केला, तसेच मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्री यांनी अधिकाऱ्यांना सदर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी-त्र्यंबकेश्वरजलसिंचनाची कामे मंजूर असलेली गावे...सामुंडी - ३ कोटी ( ७०% अपूर्ण)खरोली - ३.५ कोटी - (५५० एकर क्षेत्र)आळवंड - ३ कोटी (५०० एकर क्षेत्र )डहाळेवाडी - ३.५ कोटी (५०० एकर क्षेत्र)आव्हाटे - ३.१७ - कोटी (२१८ हेक्टर पैकी १०० एकर सिंचनाखाली)चंद्राचीमेट/ देवगांव - ६.५ कोटी (१,१०० एकर क्षेत्र) 

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत