शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच : पंधरा टक्के पाण्याची तूट 

By दिनेश पाठक | Updated: July 2, 2024 10:39 IST

मागील वर्षाच्या पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. 

दिनेश पाठक /नाशिक : पावसाळा सुरू हाेऊन एक महिना उलटला तरी वरूणराजा धो धो बरसलेला नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जलसंकट अधिक तीव्र झाले आहे. मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये 2 जुलैअखेर केवळ ७.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेचा पाणीसाठा २२.५६ टक्के इतका होता. यंदा कडाक्याच्या उन्हाने पाण्याचे बाष्पीभवन वेगात झाले असून १५ टक्के साठा मागील वर्षाच्या तुलनेने कमी झाला आहे. मागील वर्षाच्या पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता. 

जूनमध्ये झालेल्या अगदी  तुरळक पावसाने धरणांमधील पाणी साठ्यात कोणतीच वाढ झालेली नाही. हा पाऊस सर्वत्र मुसळधार झाला तर पाण्याचा प्रश्न थोडा सुटेल. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा १९.१७ टक्के आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर कश्यपी धरणातून गंगापूर धरणात पोलिस बंदोबस्तात पाणी साेडण्यात आले. पाणीसाठ्यावर आपला हक्क सांगणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाण्याच्या कारणाने संघर्ष पेटला.मात्र तरी देखील गंगापूर धरणात केवळ पंधरा टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील भोजापूर, नागासाक्या, पुणेगाव, तिसगाव, वालदेवी, भावली, ओझरखेड, माणिकपुंज ही धरणे कोरडी पडली आहेत. सर्वात मोठ्या अशा गिरणा धरणातही केवळ नऊ टक्के पाणी असून नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील 180 गावेही या धरणावर अवलंबून आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांत अजूनही टॅंकरने पाणी पुरवठा केला जातोय.

टॅग्स :Nashikनाशिक