शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारेची वसाहत मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:53 IST

नांदूरशिंगोटे : येथील पाटबंधारे विभागाच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, इमारतीवरील पत्रे उडाले आहेत. सर्वच इमारतींंना गाजर गवत व काटेरी झुडपांनी विळाखा घातला आहे.

ठळक मुद्देवीस वर्षापासून वसाहतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था

सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील शासकीय आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची झालेली दुरवस्था.

 

नांदूरशिंगोटे : इमारतींची दुरवस्था; कर्मचारी निवासस्थानांचे पत्र उडाले

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरशिंगोटे : येथील पाटबंधारे विभागाच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, इमारतीवरील पत्रे उडाले आहेत. सर्वच इमारतींंना गाजर गवत व काटेरी झुडपांनी विळाखा घातला आहे.येथे नाशिक पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत सिंचन शाखेचे कार्यालय व वसाहत आहे. तालुक्यातील सर्वात मोठे असणाºया भोजापूर धरणाची निर्मिती झाल्यानंतर येथे कार्यालय व कर्मचाऱ्यांसाठी वसाहत थाटण्यात आली आहे. परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून वसाहतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालीआहे. कार्यालय, कर्मचारी निवासस्थान, विश्रामगृह, चौकीदार कक्ष, गोडाउन, तार आॅफिस आदींच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. गोडाउन व कर्मचारी निवासस्थानाचे पत्रे उडून गेलेले आहेत. त्यामुळे भोजापूर धरणाच्या कार्यालयाकडे जाणेही अवघड झाले आहे.कार्यालयातील वीजपुरवठा खंडित असून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यालय व वसाहत मरणयातना सोसत असल्याचे चित्र आहे.सुरगाणा : जीव मुठीत धरून कर्मचाºयांचे वास्तव्यसुरगाणा : अतिवृष्टीमुळे सुरगाणा तालुक्यातील पळसन येथील शासकीय आश्रमशाळेतील कर्मचारी निवासस्थानांची दुरवस्था झाली असून, जीव मुठीत धरून वास्तव्य करावे लागत आहे.पळसन येथे शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षक, मुख्याध्यापक व कर्मचारी याची निवासस्थानं जुनी असल्याने छपरावर मोठे गवत उगवले असून झाडे उगवल्याने भिंतींना तडे गेले आहेत. या झाडांची मुळे घरात आतील बाजूस भिंतीवरदेखील स्पष्टपणे दिसतात. परिसरात गवत उगवले असल्याने घरात विंचू, सर्प इत्यादी प्राणी केव्हाही प्रवेश करण्याची भिती कायम असते. त्यामुळे अशा निवासस्थानी रहात असलेले सर्व कुटुंब व कमर्चारी विशेषता रात्रीचे वेळी भीतीच्या दडपणाखाली असतात. संबंधितांनी दुर्दशा झालेल्या या निवासस्थानांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.सुरगाणा येथील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या निवास इमारतींची अवस्थादेखील फार काही चांगली नाही. वनविभाग अधिकारी व कर्मचाºयांचे जुनी असलेली निवासचाळ कुणीही रहात नसल्याने चहूबाजूंनी मोठी झाडे उगवल्याने व छपरावर मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साठल्याने ही जूनी दगडी बांधकाम असलेली निवास चाळ अधोगतीकडे चालली आहे. तर आरोग्य विभाग निवास इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. याठिकाणी इमारतींचे अवशेष दिसतात.सुरगाणा शहरासह तालुक्यातील अशा निवासस्थानांची दुरुस्ती करून किंवा नवीन बांधकाम करून शासकीय अधिकारी व कमर्चारी यांची रहाण्याची गैरसोय दूर करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Homeघरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग