शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

अनियमित घंटागाड्यांनी महिला हैराण

By admin | Updated: October 27, 2016 23:49 IST

अनियमित घंटागाड्यांनी महिला हैराण

 येवला : नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालिकेचा प्रभाग क्रमांक चारमध्ये मिल्लतनगर, रायगड, विठ्ठलनगर, वेद कॉलनी, साने गुरुजीनगर, ताज पार्क या भागाचा समावेश होतो.बदललेल्या प्रभाग पद्धतीत सर्वात कमी (एक हजार ८६७) मतदार असलेला हा प्रभाग आहे. प्रभाग क्र.४ ची लोकसंख्या चार हजार १८० आहे. यात एकूण मतदार एक हजार ८६७ आहेत. यात पुरु ष केवळ ९७९ महिला ८८८ यांचा समावेश आहे. प्रभाग क्र मांक चार मध्ये प्रभाग अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे तर ब-सर्वसाधारण आहे. (वार्ताहर)असा आहे प्रभाग४उत्तर-पूर्व टोकापासून निघून पूर्वेकडे नगरसूल रस्त्याने रेल्वे चौकीपर्यंत जवळील सर्व्हे नंबर ५८च्या उत्तर-पूर्व टोकापासून दक्षिणेकडे वळून रेल्वेलाईनने सर्व्हेे नंबर ७५ व ५७ पर्यंत व पुढे नागडे रस्ता ओलांडून नागडे शिवारातील सर्व्हे नंबर ५५-अ आणि ५६ पर्यंत ५४ ,७० च्या दक्षिण टोकापर्यंत कोटमगाव रेल्वे चौकीपर्यंत येथून पश्चिमेकडे औरंगाबाद-नाशिक महामार्गाने हॉटेल मनाली शेजारील मोकळ्या जागेपर्यंत व पुढे रिकाम्या प्लॉटपर्यंत येथून उत्तरेकडे वळून कॉलनी रस्त्याने तिवारी यांचे बंगल्यापासून पुढे सरळ रस्त्याने भावसार यांचे गणेश मंडपपर्यंत जाऊन पुढे रस्ता ओलांडून हर्षदीप बंगल्याशेजारी रिकाम्या प्लॉटपर्यंत जाऊन पश्चिमेकडे वळून साने गुरु जीनगरमधील योगीता भालेराव यांचे बंगल्यापर्यंत येऊन पंचशील बंगला, सुगंधाकुंज बंगल्यापासून उत्तरेकडे वळून कॉलनी रस्त्याने ताज पार्क येथील दत्तमंदिरापर्यंत जाऊन रस्ता ओलांडून अय्याज शेख यांच्या शेजारील नजीर कटलरीवाले यांच्या बंगल्यापर्यंत जाऊन पश्चिमेकडे वळून नांदगाव रस्त्यावरील विजेच्या डीपीपर्यंत जाऊन उत्तरेकडे वळून नांदगाव रस्त्याने ताज हॉटेलपर्यंत जाऊन नागडे रस्ता ओलांडून उत्तर-पूर्व टोकापर्यंतच्या दरम्यान असणारा हा भाग प्रभाग क्र मांक चारमध्ये समाविष्ट होतो. ४हा प्रभाग संपूर्णपणे नववसाहत म्हणून मोडतो. माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक उषाताई शिंदे, भारती जगताप, मीना तडवी, संजय कासार हे चार नगरसेवक प्रतिनिधित्व करीत आहेत. प्रभागात नगरसूल रस्त्यासह केवळ डांबरीकरणाची, कॉँक्र ीटीकरणाची कामे झाली आहेत. परिसरात विठ्ठल नगरला जोडून आता मोठी वसाहत निर्माण झाली आहे. रस्त्यांची काही कामे बाकी आहेत.पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम झाले आहे. स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्था नसल्याने प्रत्येक बंगल्याजवळ शोषखड्डे घेतले गेले आहे. अनेकदा सांडपाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार होत असतात. भूमिगत गटार योजनेची प्रतीक्षा या भागातील नागरिकांना आहे.४ प्रभागातील खुल्या जागांचा विकास व्हावा आणि खासगी उद्योजकाने मदत करून येथे खुल्या जागेचा विकास होण्याची अशा या भागातील नागरिकांना आहे. या भागात दोन सार्वजनिक शौचालय बांधले गेले आहे. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्याची समस्या दूर झाली आहे. मुलांना खेळण्यासाठी क्र ीडा संकुल असले तरी कॉलनीजवळील भागात मुलांना खेळण्यासाठी क्र ीडांगण असावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. कॉलनी भागात रस्ते आणि उत्तम प्रकारची पथदीप व्यवस्था, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवून चांगल्या नागरी सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा येथील नागरिकांची आहे. या परिसरात दररोज कचरा साफ केला जावा. या भागात घंटागाडी नियमित येत नसल्याच्या तक्र ारी महिलांनी केल्या.