शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारासह कुटुंबावर लोखंडी गजाने  हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:10 IST

दुकान बंद झाल्यानंतर बिडी मागितली म्हणून दुकानदाराने नकार दिला, त्याचा राग मनात धरून संशयित जाकीर शहा, लतिफ उर्फ चिड्ड्या शहा याने दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांवर लोखंडी गजाने हल्ला चढविला. या हल्ल्यात दुकानदार सलीम शहा व त्यांची पत्नी जखमी झाले

इंदिरानगर : दुकान बंद झाल्यानंतर बिडी मागितली म्हणून दुकानदाराने नकार दिला, त्याचा राग मनात धरून संशयित जाकीर शहा, लतिफ उर्फ चिड्ड्या शहा याने दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांवर लोखंडी गजाने हल्ला चढविला. या हल्ल्यात दुकानदार सलीम शहा व त्यांची पत्नी जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित जाकीर व चिड्ड्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी रात्री मनपाच्या घरकुल प्रकल्पात हाणामारीची घटना घडली. जाकिर याने दुकान बंद झाल्यानंतर सलीम यांच्याकडे बिडी देण्याची मागणी केली. त्यांनी नकार देत दुकान बंद केले आहे, असे सांगितले. वसाहतीत एका महिलेचे निधन झाल्यामुळे दुकान उघडून बिडी विक्री करणे शोभणारे नाही, असे ते म्हणाले. यावेळी जाकिरने लोखंडी रॉडने सलीम यांच्यावर हल्ला चढविला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा कलीम हादेखील उभा होता. या दोघांनी बापलेकांवर हल्ला चढवून त्यांना जखमी केले. या हल्ल्यात सलीम शहा यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. यावेळी कलीम याचे वडील खाली पडल्याने त्याने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यास सुरु वात केली. यावेळी शहा याने तलवार आणून हातपाय तोडतो, असा दम दिला. यावेळी लतीफ उर्फ चिड्ड्या शहा यानेही घरातील अन्य सदस्यांना मारहाण केल्याचे कलिम याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे याप्रकरणी पोलिसांनी जाकीर शहा, चिड्ड्या व सद्दाम शहाविरुद्ध जिवे ठार मारल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकीर शहा यास पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी