शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलवर सट्टा; बुकी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:32 IST

सध्या आयपीएलचा ज्वर सुरू असून, सट्टाबाजारही तापला आहे. आयपीएल मालिकेतील चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या झालेल्या सामन्याप्रसंगी शहरामध्ये पैशांच्या बोलीवर सट्टा खेळणाऱ्या बुकिंना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

नाशिक : सध्या आयपीएलचा ज्वर सुरू असून, सट्टाबाजारही तापला आहे. आयपीएल मालिकेतील चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या झालेल्या सामन्याप्रसंगी शहरामध्ये पैशांच्या बोलीवर सट्टा खेळणाऱ्या बुकिंना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील एका हॉटेलच्या खोलीतून आयपीएलच्या चेन्नई-राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलवर इंटरनेटच्या माध्यमातून बघत सामन्याच्या स्थितीवर सट्टा लावताना तीन बुकी पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत संशयित गुरुप्रितसिंग हरबनसिंग जट (रा. केवडीबन तपोवन), अमित अनिल देसले (पंचवटी), सतनाम दिलीपसिंग राजपूत (कोणार्कनगर) यांना अटक केली आहे. राजपूत याच्या सांगण्यावरून संगनमताने त्याच्या मारुती स्विफ्ट कारचा (एम.एच.०४, डी.वाय४६०८) वापर करत अंबडमधील एका हॉटेलमध्ये सट्टा खेळला जात होता. या कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, पोपट करवाळ, विजय गवांदे, मोहन देशमुख, आदींनी सहभाग घेतला. आयपीएलसंदर्भात शहरात अशाप्रकारे कुठेही अवैध व्यवसाय होत असल्यास नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.कोडद्वारे बोलीसंबंधित तीनही बुकिंनी इंटरनेटवर लाइव्ह सामना बघत एका शंभरपानी मोठ्या वहीत लिहिलेल्या कोडवर्डद्वारे बोली लावली होती. यानुसार फोनवर बुकी सट्टा घेताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सदर वहीसह नऊ मोबाइल, स्विफ्ट कारसह काही रोख रक्कम असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यातील पुढील तपासासाठी संशयितांना अंबड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा