मनोरंजक पध्दतीने संख्यांची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:48 PM2020-03-18T13:48:04+5:302020-03-18T13:50:05+5:30

सटाणा: येथील जिल्हा परिषदेच्या  शाळा मोरेनगर या शाळेत शाळेतील राष्ट्रपती आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांनी नाविन्यपूर्ण उपक्र म राबवून   विद्यार्थ्यांना मनोरंजकपध्दतीने गणित शिकवून संख्यांची ओळख करून दिलीआहे.

 Introduction to numbers in interesting ways | मनोरंजक पध्दतीने संख्यांची ओळख

मनोरंजक पध्दतीने संख्यांची ओळख

Next
ठळक मुद्दे  सटाणा: मोरेनगर या शाळेतील उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद 

आधार कार्डचा उपयोग करून  विद्यार्थ्यांची गणित या  विषयाशी त्यांनी मैत्री करून दिली आहे.गणित विषयाच्या अंक ज्ञान, संख्याज्ञान ,बारा अंका पर्यंत संख्या वाचन , संख्या लेखन ,संख्यांवरील क्रि या , विस्तारित रूप ,बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार ,संख्यांचा चढता उतरता क्र म आधी गणितीय अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने प्राप्त झाल्या आणि याच आधार कार्डने सोडवलं त्याचं व्यवहाराचं  गणित असंच म्हणता येईल .
             या उपक्र मातून विद्यार्थी मनोरंजक पद्धतीने गणित विषय शिकायला लागली आहेत.मुलांना संख्यांची ओळख सोप्या पद्धतीने होऊ लागली आहे., संख्या ज्ञान दृढीकरण होऊन आधार कार्ड यासंकल्पनेविषयी माहिती झाली आहे . संख्यांमधील चढता उतरता क्र म सोप्या पद्धतीने समजून  , विद्यार्थ्यांना बारा अंकी (एकक ते दश अब्ज पर्यंत) संख्या मनोरंजक पद्धतीने वाचता लिहता येऊ लागल्या आहेत. स्वत:चे तसेच वर्गातील सर्व मित्रांचे आधार क्र मांक ,आधार संख्या माहिती झाली आहे विद्यार्थ्यांना आधार कार्ड द्वारे होणारे विविध व्यवहार माहिती झाले आहेत. 

-गणित विषयाच्या  अध्ययन क्षमता सोप्या व मनोरंजक पद्धतीने विद्यार्थांना अवगत होण्यासाठी  आधार कार्ड वरील कल्पक व नाविन्यपूर्ण अफलातून उपक्र म मोरेनगर शाळेतील सोपान खैरनार यांनी  यशस्वीपणे राबवून नक्कीच संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना अनुकरणीय उपक्र म केला आहे . 
-मीना मोरे, जिल्हापरिषद सदस्य.
 

Web Title:  Introduction to numbers in interesting ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.