शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

आरटीओची प्रतिमा मलीन करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:53 IST

नाशिक : एका निलंबित अधिकाऱ्याने वाममार्गाने ज्या खात्यात आपण नोकरी केली त्याच खात्याची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र रचून अधिकाऱ्यांविषयी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे पूर्णपणे निराधार असल्याचे नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या प्रसिद्धीपत्रकवजा खुलाशात म्हटले आहे.

ठळक मुद्देभरत कळसकर : भ्रष्टाचाराचे सर्व आरोप निराधार असल्याचा दावा

नाशिक : एका निलंबित अधिकाऱ्याने वाममार्गाने ज्या खात्यात आपण नोकरी केली त्याच खात्याची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र रचून अधिकाऱ्यांविषयी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे पूर्णपणे निराधार असल्याचे नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या प्रसिद्धीपत्रकवजा खुलाशात म्हटले आहे.आरटीओच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीबाबत शहर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या तक्रार अर्जामधील सर्व आरोपांचे खंडन केले आहे. एका अधिकाऱ्याच्या मयत पत्नीविषयी आक्षेपार्ह व मानहानीकारक मजकूर असलेली पत्रके रात्रीच्या सुमारास धुळे कार्यालयात आणून टाकल्याच्या गुन्ह्याचा तपासाचा गोपनीय अहवाल पोलीस अधीक्षकांकडून प्राप्त झाल्यानंतर शासनाने या अहवालानुसार चालू वर्षी जानेवारीत तक्रारदार गजेंद्र पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, असे कळसकर यांनी म्हटले आहे. पाटील यांनी केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी होणे हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असून ती अवश्य झाली पाहिजे, असेही कळसकर यांनी स्पष्ट केले आहे. तक्रारीतील आरोपांबाबतचे पुरावेही तक्रारदाराने पोलिसांकडे द्यावे, असेही ते म्हणाले.वाहनांची नोंदणीविषयी माहिती संगणकीय प्रणालीवरजळगाव येथे इर 4 वाहन नोंदणी मध्ये २,४०० वाहनांची प्रत्येकी १२ हजार रुपये घेत नोंदणी केली, असा आरोप तक्रारीत केला गेला आहे. हा आरोप पूर्णपणे निराधार व खोटा आहे. कारण या नोंदणी प्रक्रियेचा अहवाल परिवहन आयुक्त कार्यालयाकडे पाठविला गेला आहे. ही सर्व माहिती संगणकावर  सर्वत्र उपलब्ध आहे. धुळ्याचे प्रभारी पदभार सांभाळताना जळगाव कार्यालयाचे नोंदणी अधिकारी अथवा अपिलीय अधिकारी मी कसा असू शकतो, असा प्रश्नही कळसकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच कुठल्याही बदल्यांचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले नाही, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसCrime Newsगुन्हेगारी