शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरून  कमी किमतीत विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:09 IST

ग्रामीण भागातील नागरिकांच्या दुचाकी चोरून त्यांची कमी किमतीत विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेतला आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील या टोळीच्या दोन संशयितांनाही अटक केली

नाशिक : ग्रामीण भागातील नागरिकांच्या दुचाकी चोरून त्यांची कमी किमतीत विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेतला आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील या टोळीच्या दोन संशयितांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल अकरा दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत़ सतीश पंढरीनाथ पिंपळे (२०, रा. चंदनझिरा, जालना) आणि नितीन दत्ता कराडे (३०, रा. वाळुंज एमआयडीसी, औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे व पथकाने बनावट नंबरप्लेट तयार करून कमी किमतीत दुचाकी विक्री करणाºयांवर लक्ष केंद्रित केले होते़ कळवण तालुक्यातील नांदुरीमध्ये अशा प्रकारे दुचाकींची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी (दि़२८) या परिसरात सापळा रचून नांदुरी गडाकडे दुचाकीवरून जाणारे संशयित पिंपळे व कराडे या दोघांना संशयितांना ताब्यात घेतले़  पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच मोहाडी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली़ तसेच साथीदार संतोष जाधव (रा़ जालना), वसंत चोथवे (रा़ वणीगड, ता़ कळवण) यांच्यासोबत नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर व श्रीरामपूर या परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली देत दोन लाख ९० हजार रुपये किमतीच्या चोरलेल्या ११ दुचाकीही काढून दिल्या़ पोलीस उपनिरीक्षक एम. एस. रणमाळे, रामभाऊ मुंढे, संजय पाटील, हनुमंत महाले, तूपलोंढे, जे. के. सूर्यवंशी, यांच्या पथकाने ही कारवाई केली.बनावट नंबर प्लेट तयार करून विक्रीग्रामीण भागातील दुचाकींची चोरी केल्यानंतर त्यावर बनावट नंबरप्लेट लावून तिची कमी किमतीत विक्री करण्याचे काम ही टोळी करीत होती़ त्यामुळे वाहनांची नंबर प्लेट तयार करून देणाºयांनी आरसी बुक, वाहनपरवाना व आधारकार्ड घेतल्यानंतरच नंबरप्लेट बनवून देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक दराडे यांनी केले आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा