शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ लघुपटाला आंतरराष्ट्रीय सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:30 IST

रशियन फेडरेशन, मॉस्को संस्थेतर्फे लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाशिकच्या ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ या मराठमोळ्या लघुपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ या विभागात सन्मानित करण्यात आले आहे.

नाशिक : रशियन फेडरेशन, मॉस्को संस्थेतर्फे लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नाशिकच्या ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ या मराठमोळ्या लघुपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ या विभागात सन्मानित करण्यात आले आहे.  पंढरपूर वारी या विषयावर साकारलेल्या या लघुपटात प्रत्येकाचा आपल्या आत्मशोधावर आधारित असलेल्या प्राजक्त देशमुख यांच्या मुक्त काव्याच्या आधारे तसेच वारीतल्या विविध दृश्यांची गुंफण करून हा अनोखा अनुभव लघुपट साकारण्यात आला आहे. उत्तम छायाचित्रकार असलेला अभिषेक कुलकर्णी आणि मराठी रंगभूमीवरील कलाकार प्राजक्त देशमुख ही जोडगोळी लघुपट क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करत असून, ‘इन सर्च आॅफ विठ्ठल’ हीदेखील अशीच एक वेगळी निर्मिती आहे.  वेळेनुसार विभागणी करून दिलेल्या विजेत्यांच्या गटात चाळीस मिनिटातल्या श्रेणीत या लघुपटाला विजयी घोषित करण्यात आले. या चित्रपटाला आनंद ओक यांनी संगीतसाथ दिली असून, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांच्या स्वरात या लघुपटातील संवाद गुंफण्यात आले आहेत. दिग्दर्शक म्हणून प्रत्येक पुरस्कारासोबत जबाबदारी वाढत चालली असून, पुढचं काम आणखी उंचीवर नेण्याचं दडपण आहे. प्राजक्त आणि मी अनेक विषयांवर चर्चा करीत असतो. लवकरच एक नव्या लघुपटाला आम्ही सुरुवात करणार आहोत. विठ्ठलाचा शोध आम्हाला वेगवेगळे सन्मान मिळवून देतोय, हे खूप आनंददायी आहे. - अभिषेक कुलकर्णी  (दिग्दर्शक, छायांकन) आम्ही या लघुपटासाठी प्रचंड मेहनत घेतली असून, वर्षभरानंतरही त्याला विविध सन्मान मिळाले. गेल्यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर आता मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले ही अभिमानाची गोष्ट आहे.- प्राजक्त देशमुख  (लेखक, पटकथा)

टॅग्स :cinemaसिनेमाNashikनाशिक