शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

नवरात्रोत्सव ‘कॅश’ करण्याचा इरादा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:38 IST

नवरात्रोत्सवाच्या मध्यापर्यंत बहुतांश पक्ष, आघाडी, युती यांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला फारसा कालावधी नसल्याने तसेच नवरात्रोत्सवासारखा नागरिकांच्या सहभागाचा सण आयताच हाती गवसणार असल्याने यंदाच्या निवडणुकी तील बहुतांश इच्छुकां- कडून प्रचारासाठी या सणाचा पुरेपूर वापर करून घेण्याचे नियोजन आखले आहे.

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या मध्यापर्यंत बहुतांश पक्ष, आघाडी, युती यांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला फारसा कालावधी नसल्याने तसेच नवरात्रोत्सवासारखा नागरिकांच्या सहभागाचा सण आयताच हाती गवसणार असल्याने यंदाच्या निवडणुकी तील बहुतांश इच्छुकां- कडून प्रचारासाठी या सणाचा पुरेपूर वापर करून घेण्याचे नियोजन आखले आहे. अर्थात या तयारीची जिल्हा प्रशासनालादेखील जाणीव झाली असल्याने त्यांच्याकडून नवरात्रोत्सव आणि गरब्यासाठीच्या मंडपांतील उपक्रमांवरही नजर ठेवली जाणार आहे.शनिवारच्या सर्वपित्री अमावास्येनंतर नवरात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ होत असून, चांगल्या मुहूर्तावर अर्ज भरणे त्यामुळे सोमवारपासून शक्य होणार आहे. सर्व युती आणि आघाड्यांसह अन्यराजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास रविवारी किंवा सोमवारी प्रारंभ होणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या मध्यापर्यंत अर्थात ३ आॅक्टोबरपर्यंत बहुतांश प्रमुख उमेदवारांनी अर्ज भरण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केलेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर मिळणारे नवरात्रोत्सवाचे उत्तर पर्वातील चार दिवस तसेच ८ तारखेचा दसºयाचा सण हादेखील नागरिकांसमवेत जनसंपर्कासाठी मोक्याचा ठरणार आहे.त्यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रत्येक दिवस हा उमेदवारांसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळांना वेगवेगळ्या दिवशी भेटी देणे, तेथील दांडिया-गरब्यात सहभागी होणे, तिथे येणाºया नागरिकांशी संवाद साधणे, प्रचारपत्रकांचे वाटप करीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.दसºयाचा इच्छुकांना धसका४दसºयाच्या दिवशी सोने म्हणून आपट्याचे पान एकमेकांना देण्याची प्रथा आहे; मात्र अगदी निवडणुकीच्या तोंडावर दसरा आल्याने दसºयाच्या दिवशी उमेदवारांकडून खरेखुरे सोने लुटायला मिळणार का ? असा सवाल आतापासून समाजमाध्यमांवर फिरू लागला आहे. त्यामुळे दसºयाला मतदारांना केवळ समाज माध्यमांवरूनच शुभेच्छा देण्याचा मानसदेखील अनेक इच्छुकांकडून व्यक्त केला जात आहे.निवडणूक आयोग दक्ष४निवडणुकीसाठीचे मतदान होईपर्यंत प्रत्येक सण, सोहळ्यावर निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाची नजर राहणार आहे. या सण, समारंभांमध्ये कोणत्याही प्रकारे प्रचार, प्रसाराचा प्रयत्न झाल्यास संबंधित पक्षाच्या उमेदवाराच्या खर्चात तो समाविष्ट केला जाणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Navratriनवरात्री