या संदर्भात बँकेचे अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हा बँकेकडून द्राक्ष, कांदा, ऊस इत्यादी पिकांना कर्ज दिले जाते. यामध्ये जिल्हयातील प्रमुख पीक असलेल्या द्राक्ष पिकासाठी द्राक्ष (सुधारित) पिकासाठी रक्कम रुपये दीड लाख व निर्यातक्षम द्राक्ष या पिकासाठी दोन लाख रुपये कर्ज दिले जाते. सदर कर्ज रकमेस सुरक्षा म्हणून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. अथवा या रकमेला विमा सरंक्षण देखील दिले जात नाही. दुर्दैवाने अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, थंडीची लाट नैसर्गिक आपत्ती आल्यास हाता-तोंडाशी आलेल्या द्राक्ष पिकाचे नुकसान होते. त्यामुळे द्राक्ष उत्पन्नासाठी केलेला खर्च वाया जातो. परंतु यात बँकेचे कर्जमात्र फेडावेच लागते. अशा परिस्थितीत सदर कर्जाला विमा संरक्षण कवच असल्यास शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करणे सोयीचे होईल. मात्र बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाला विम्याचे सरंक्षण नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते यासाठी बँकेने कर्ज पुरवठा करतांना त्या रकमेला विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांना व बँकेला फायदा होईल. यासाठी कर्ज रकमेला विमा सरंक्षण देण्यात यावे, अशी मागणीही संजय बनकर यांनी केली आहे.
द्राक्षाच्या कर्ज रकमेला विमा संरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST