शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उपनगर पोलीस ठाण्यात अपुरे संख्याबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:56 IST

उपनगर पोलीस ठाण्याची हद्द, लोकसंख्या आदी सर्व घटना घडामोडीचा विचार करता परिस्थिती हाताळताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने त्याचा परिणाम कायदा-सुव्यव्था अबाधित राहण्यावर होत आहे.

नाशिकरोड : उपनगर पोलीस ठाण्याची हद्द, लोकसंख्या आदी सर्व घटना घडामोडीचा विचार करता परिस्थिती हाताळताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने त्याचा परिणाम कायदा-सुव्यव्था अबाधित राहण्यावर होत आहे. आता तर पोलीस ठाण्यात कार्यालयीन कामकाज सांभाळणाºया पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील बीट मार्शल नेमण्यात आल्यामुळे, तर कार्यालयीन प्रशासकीय कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे.२०११ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्याचे विभाजन करून उपनगर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. स्वत:ची जागा नाही, अधिकारी-कर्मचारी संख्या अपूर्ण यामुळे सर्वांवर कामाचा ताण असतो. पोलीस ठाण्याला स्वत:ची जागा नसल्याने निर्माण होणाºया तांत्रिक अडचणी आदी कारणामुळे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यावर परिणाम होता. सद्यस्थितीला दोन पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, चार उपनिरीक्षक, १ महिला उपनिरीक्षक व १०० महिला-पुरुष कर्मचारी आहेत. उपनगर पोलीस ठाण्याची हद्द ३०-३५ किलोमीटरची असून, सुमारे तीन-साडेतीन लाख लोकसंख्या व १८ झोपडपट्ट्या आहेत. शहराचा दिवसेंदिवस झपाट्याने विकास होत असून, रस्त्यांची कनेक्टिव्हीटी मोठ्या प्रमाणात आहे.वाढणारे गुन्हे लक्षात घेऊन गेल्या काही दिवसांपासून पाच बीट मार्शलचे पथके नेमण्यात आले असून, त्यासाठी ३० कर्मचाºयांना तीन पाळ्यांमध्ये विभागण्यात आले आहे. यात पोलीस ठाण्यात प्रशासकीय कामकाज करणाºया पोलीस कर्मचाºयांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे कार्यालयीन कामकाजावर मोठा परिणाम होऊ लागला आहे.अधिकारी-कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे सर्वांवर कामाचा ताण पडतो. यामुळे गुन्हे उघडकीस येणे, भाईगिरी-टवाळखोरांचा बंदोबस्त करणे, गुन्हे रोखणे, नागरिक व पोलिसांमध्ये सुसंवाद अशा सर्वच प्रकारांना मर्यादा निर्माण झाली आहे. नवीन गुन्हेगार, चोरटे यांची माहिती पाहिजे तशी नसल्याने त्याचा परिणाम गुन्हे घडण्यावर व उकल होण्यावर झाला आहे.कर्मचारी नसल्याने माराव्या लागतात चकरासामान्य व्यक्तीस संबंधित कार्यालयीन कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने चकरा माराव्या लागतात. ५ ते ७ कर्मचारी सिक रजेवर असून, दररोज १३-१५ कर्मचाºयांची साप्ताहिक सुटी असते. प्रसूती रजा व बालसंगोपन दोन महिला कर्मचारी सुटीवर आहेत, तर न्यायालयात तीन कर्मचारी नियुक्त आहेत. देवळालीगाव, बिटको कॉलेज, जेलरोड, दसक, गांधीनगर पोलीस चौकीत दिवस-रात्र पाळीला प्रत्येकी दोन कर्मचारी असतात. गुन्हे लिपिक कक्ष, गोपनीय शाखा, आदी ठिकाणचे नियुक्ती कर्मचारी वगळल्यास हातावर मोजण्या इतके सुद्धा कर्मचारी पोलीस ठाण्यात शिल्लक राहत नाही.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय