नाशिक : देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन शहरातील विविध शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शाळेत वाचन कट्टा, ग्रंथपेटी भेट तसेच वाचनाचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम झाले. रवींद्रनाथ विद्यालयद्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. ज्ञान हवे असेल, तर वाचन हवे, वाचनाशिवाय माणसाला ज्ञान आणि पर्यायाने विवेक बुद्धी प्राप्त होऊ शकत नाही, असे मत रवींद्रनाथ विद्या प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस वासंती गटणे यांनी व्यक्त केले. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन उपयोग नाही, तर अवांतर वाचन करून विविध क्षेत्रातील ज्ञान संपादन केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. संस्थेचे संचालक हरि काशीकर, वसंतराव राऊत, तसेच ग्रंथपाल मृणाल पाठक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्याध्यापक रामदास गायधनी यांनी प्रास्ताविक केले, तर पर्यवेक्षक पुष्पा काळे यांनी आभार मानले.रचना माध्यमिक विद्यालयरचना विद्यालयात सहावीच्या विद्यार्थ्यांनी वाचक पेट्यांच्या माध्यमातून वाचनाचा आनंद घेतला, तर इयत्ता सातवी व आठवी करता माजी विद्यार्थिनी मुक्ता चैतन्य, कवी प्रफुल्ल लेले, हेमंत उनवणे यांनी आपल्या वाचनातून आम्ही कसे घडलो, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक सुचेता येवला, संगीता टाकळकर, सुनील गायकवाड ग्रंथपाल प्रतिभा पारनेरकर, शांताराम अहिरे, कौस्तुभ मेहता उपस्थित होते.व्ही. एन. नाईक महाविद्यालयव्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख प्रा. दिलीप कुटे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ग्रंथप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी वाचन स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका हिंदी विभागप्रमुख नंदादेवी बोरसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वंदना बनकर, तर प्रा. तुकाराम भवर यांनी आभार मानले.मोदगे प्राथमिक विद्यामंदिरचुंचाळे येथील मनपा शाळा क्र. २८ (मुली) या शाळेत अनिल सुळ यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर माहिती दिली. तसेच दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी कलाम यांच्या जीवनावरील प्रसंगरुपी बोधकथा मांडली. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तके उपलब्ध करून देण्यात येऊन वर्गावर्गात वाचन उपक्रम घेण्यात आला. के. जे. मेहता हायस्कूलके. जे. मेहता हायस्कूल व इ. वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करून विद्यार्थ्यांनी सलग पाच तास ग्रंथालयातील विविध विषयांवरील आधारित पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य हेमंत देवनपल्ली, एस. के. निकम, पर्यवेक्षिका करुणा आव्हाड, रमाकांत महाजन, शिवाजी राहिंज तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.छत्रपती शिवाजी विद्यालयशिंदेगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बी. एम. जाधव यांनी केले. यावेळी व्ही. बी. बडे यांनी कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. आभार एस. एस. जाट यांनी मानले. यावेळी के. सी. टोंगरे, पी. डी. बागुल, एस. आर. वाळेकर, जे. जे. परदेशी, के. डी. गायकवाड, एस. यू. गावित, श्रीमती आरोटे, काकड, जाट आदि उपस्थित होते.मनपा शाळा क्र. १३३विहितगाव शाळा १३३ मध्ये शिक्षक बबन राठोड यांनी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. मुख्याध्यापक तेजस्विनी बिरारी, भारती गायकवाड यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी राजमोहम्मद देशमुख होता. आभार नंदा झोपे यांनी मानले. उपनगर महाराष्ट्र हायस्कूलउपनगर येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दत्ता गोसावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस. बी. वैद्य उपस्थित होते. प्रारंभी कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राजेंद्र सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वृषाली जायभावे व आभार स्वाती पवार यांनी मानले.
शाळा-शाळांमध्ये वाचनाची प्रेरणा...!
By admin | Updated: October 17, 2015 23:45 IST