शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:14 IST

लासलगाव येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी घडलेल्या महिला जळीत प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि तपास कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, पीडित महिलेची प्रकृती स्थिर असून सर्वोत्तम उपचार व्हावेत यासाठी स्वत: जातीने लक्ष घालत असल्याचे आरती सिंह यांनी सांगितले.

ठळक मुद्देजळीत प्रकरण : तपास कार्याचा आढावा

लासलगाव : येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी घडलेल्या महिला जळीत प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि तपास कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, पीडित महिलेची प्रकृती स्थिर असून सर्वोत्तम उपचार व्हावेत यासाठी स्वत: जातीने लक्ष घालत असल्याचे आरती सिंह यांनी सांगितले.डॉ. आरती सिंह यांनी लासलगाव बसस्थानकात ज्याठिकाणी घटना घडली तेथे जाऊन पाहणी केली. यावेळी निफाडचे पोलिस उपअधिक्षक माधव रेड्डी व लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे त्यांचे समवेत होते.आरती सिंह यांनी आतापर्यंत झालेल्या तपास कार्याचा आढावा घेत तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर लासलगाव पोलिस स्थानकात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, पीडितेच्या पहिल्य पतीचे निधन झाले आहे आणि पहिल्या पतीपासून तिला तीन लहान मुले आहेत. पीडितेची प्रकृती तंदुरुस्त होण्यासाठी बराच काळ जाणार आहे. त्यामुळे मनोधैर्य योजनेतून काही आर्थिक मदत करता येईल काय, या विषयी नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे. या गुन्ह्याचा पोलिस तपास व्यवस्थित सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.लासलगाव येथे पोलीस संख्या वाढविली पाहिजे याकरिता आपण जातीने लक्ष घालू तसेच बसस्थानकावर मुलींच्या सुरक्षेबाबत पोलीस लक्ष घालतील. त्यासाठी गृहरक्षक दलाचे जवान नेमले जातील. लासलगाव ही मोठी कांदा बाजारपेठ आहे. कांदा आवक वाढल्याने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त तात्पुरते पोलीस देण्याकरिता आपण लक्ष घालू, असेही आरती सिंह यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस