शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या धर्तीवर नाशिकमध्ये गुदाम तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 14:39 IST

सार्वजनिक वितरणप्रणालींतर्गत रेशनमधून स्वस्त दरात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी शासकीय धान्य गुदामात धान्याची साठवणूक केली जाते. जळगाव जिल्ह्यातील एका धान्य गुदामाला आमदार खडसे यांनी

ठळक मुद्देरेशनचा काळाबाजार : विभागीय आयुक्तांचे आदेशगुदाम तपासणीतून तीन वर्षांपूर्वी सुरगाणा धान्य घोटाळा उघडकीस आला होता

नाशिक : गेल्या महिन्यात माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावात रेशन गुदामाची तपासणी करून त्यातील गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर केलेल्या तक्रारीतून विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नाशिक विभागातील सर्वच जिल्ह्यांच्या शासकीय धान्य गुदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गुदामांची अधिका-यांकरवी कसून तपासणी केली जात आहे. रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी टाकलेले हे पाऊल असून, अशाच गुदाम तपासणीतून तीन वर्षांपूर्वी सुरगाणा धान्य घोटाळा उघडकीस आला होता हे विशेष!सार्वजनिक वितरणप्रणालींतर्गत रेशनमधून स्वस्त दरात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी शासकीय धान्य गुदामात धान्याची साठवणूक केली जाते. जळगाव जिल्ह्यातील एका धान्य गुदामाला आमदार खडसे यांनी अचानक भेट देत तेथील गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर त्याची दखल घेत अगोदर जळगाव जिल्ह्यातील सर्वच गुदामांची पर जिल्ह्यातील अधिका-यांकडून तपासणी करण्यात आली. त्यात १७ पैकी तीन गुदामांमधील धान्य साठवणुकीत गडबड उघडकीस आल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त झगडे यांनी विभागातील सर्व जिल्ह्यातील धान्य गुदामांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. उपजिल्हाधिकाºयांमार्फत गुदामांची कसून चौकशी करून त्याचा अहवाल तत्काळ विभागीय आयुक्तांना सादर करण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले असून, ही तपासणी निष्पक्षपातीपणे व प्रामाणिकपणे होण्यासाठी तालुक्यातील नेमणुकीस असलेल्या प्रांत अधिका-यांना दुस-या तालुक्याची तपासणी करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे वास्तव उघड होण्यास मदत होईल.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक