शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दोन डबल तर एक सिंगल साठी आग्रही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:59 IST

नाशिक- राज्यातील यापूर्वीच्या भाजपा सरकारने राजकीय सोयीसाठी चार सदस्यीय प्रभाग अस्तित्वात आणल्याचा आरोप करण्यात आला आणि आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग पध्दतीत आमूलाग्र बदल करण्याचे सध्याच्या आघाडी सरकारने ठरवले असले तरी आघाडीत याबाबत मतभेद आहेत. शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस पक्षाने देखील दोन सदस्यीय (डबल नगरसेवक) प्रभाग पध्दती अस्तित्वात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घातले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र सिंगल नगरसेवक म्हणजेच एक सदस्यीय प्रभाग पध्दतीची मागणी केली आहे. दोन डबल तर एक सिंगल अशा पध्दतीच्या मागणीत आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेते याकडे राजकीय पक्ष आणि नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीत मतभेद: काँग्रेसने महसूल मंत्र्यांकडे केली व्दिसदस्यीय प्रभागची मागणी

नाशिक- राज्यातील यापूर्वीच्या भाजपा सरकारने राजकीय सोयीसाठी चार सदस्यीय प्रभाग अस्तित्वात आणल्याचा आरोप करण्यात आला आणि आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग पध्दतीत आमूलाग्र बदल करण्याचे सध्याच्या आघाडी सरकारने ठरवले असले तरी आघाडीत याबाबत मतभेद आहेत. शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस पक्षाने देखील दोन सदस्यीय (डबल नगरसेवक) प्रभाग पध्दती अस्तित्वात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घातले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र सिंगल नगरसेवक म्हणजेच एक सदस्यीय प्रभाग पध्दतीची मागणी केली आहे. दोन डबल तर एक सिंगल अशा पध्दतीच्या मागणीत आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेते याकडे राजकीय पक्ष आणि नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.महापालिकेच्या निवडणूका तोडांवर असून त्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे. १५ दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत चार सदस्यीय पध्दतीऐवजी एक सदस्यीय पध्दतीची मागणी करण्यात आली होती. तर दुसरीकडे शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत मात्र दोन सदस्यीय प्रभागांची मागणी करण्यात आली. तसे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना घालण्यात आले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात शहर काँग्रेसची भूमिका विचारली होती. बुधवारी थोरात हे एका विवाह सोहोळ्यासाठी अचानक नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर नगरसेवक आणि पदाधिकारी अशी प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी दोन सदस्यांचा प्रभाग करावा, अशी मागणी करतानाच काँग्रेस पक्ष स्वबळावर १२२ जागांवर उमेदवार देणार असल्याचे देखील ठरवण्यात आल्याचे शहराध्यक्ष शरद आहेर व कॉग्रेस गटनेते शाहु खैरे यांनी सांगितले. बैठकीस माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील,शैलेश कुटे यांच्यासह अन्य वत्सला खैरे, राहूल दिवे, समीण कांबळे, रईस शेख, सिराजोद्दीन कोकणी, अण्णा पाटील, आशा तडवी, विजय राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होेते.भाजप- राष्ट्रवादीच्या विरोधात तक्रारी२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने मित्र पक्ष म्हणून आघाडी केली आणि प्रत्यक्षात कॉग्रेस पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे केले अशी तक्रार शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली. तर महापालिकेत भूसंपादन प्राधान्याच्या नावाखाली मोठा घोटाळा झाल्याचा आरोप गटनेते शाहु खैरे यांनी केला. महापालिकेतील चुकीच्या कामांची चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली.महापालिका निवडणुकीमुळे सतत संपर्कात राहू तसेच काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचे नाशिकमध्ये जनता दरबार भरवण्याची ग्वाही बाळासाहेब थोरात यांनी दिली. कॉंग्रेस नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याकडे जनतेच्या असलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक बोलवण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :ElectionनिवडणूकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका