शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गटार कामाची लाचलुचपत विभागाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 22:59 IST

मालेगाव : शहरातील स्टेट बँक परिसर, साठ फुटी रोड परिसरात गटार न करताच ४९ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार जिल्ह्याच्या दक्षता गुण नियंत्रण मंडळ व लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत बुधवारी (दि.१३) सात सदस्यीय पथकाने येथील शासकीय विश्रामगृहावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करीत प्रत्यक्ष गटार कामाची पाहणी केली. याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्देमालेगाव मनपा : कागदपत्रांची पडताळणी; पथकाकडून प्रत्यक्ष मोजणी

मालेगाव : शहरातील स्टेट बँक परिसर, साठ फुटी रोड परिसरात गटार न करताच ४९ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार जिल्ह्याच्या दक्षता गुण नियंत्रण मंडळ व लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत बुधवारी (दि.१३) सात सदस्यीय पथकाने येथील शासकीय विश्रामगृहावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करीत प्रत्यक्ष गटार कामाची पाहणी केली. याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.स्टेट बँक, साठ फुटी रोड व सत्यम्, शिवम्, सुंदरम् अपार्टमेंट या तीन भागात गटार बांधण्यासाठी २०११ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. २७ जानेवारी २०१२ मध्ये मे. डी. वाय. शाह या ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने साठ फुटी रोड येथे गटार बांधली. पण निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत अर्धवट काम सोडून दिल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील यांनी लाचलुचपत व दक्षता गुण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या प्रकरणाची गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरू आहे. तर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला याच भागात नव्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ५० लाख रुपये खर्चाची भुयारी गटार, रस्ता काँक्रिटीकरणाचे काम करायचे आहे. यासाठी नगरविकास विभागाला एनओसी लागणार होती. मात्र यापूर्वीच या भागात गटार काम झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जुन्या गटार कामाची चौकशी करण्यासाठी दक्षता गुण नियंत्रण मंडळाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, उपअभियंता बोडके यांच्यासह सहा सदस्यीय समितीने बुधवारी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यासाठी महापालिकेने आठ दिवसापूर्वी २ लाख ५८ हजार रुपये शासन शुल्क भरले आहे.कागदपत्रेच गायब?समितीने दिवसभर शासकीय विश्रामगृहावर कागदपत्रांची पडताळणी केली. मात्र, महापालिकेकडे कागदपत्रेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे समितीही हतबल झाली होती. प्रत्यक्षात गटारीच्या कामाची मोजणी करण्यात आली आहे. याचा अहवाल सादर केला जाणार आहे. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव, चौरे, गांगुर्डे, नगरविकास विभागाचे उपअभियंता संजय जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी