नाशिक : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पाठविण्यात आलेल्या पार्सल बॉम्ब प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाने एका संशयितास ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. याबाबत पोलिसांकडून मात्र कमालीची गोपनियता पाळण्यात आली. चौकशीसाठी ताब्यात घेतलेला संशयित हा शहरातीलच असल्याचे बोलले जात आहे.बांधकाम व्यावसायिक व महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष अनंत राजेगावकर यांच्या कार्यालयात काल अज्ञात व्यक्तीने गावठी बॉम्ब पाठविल्याने नाशिक हादरले होते. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरवून आज एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताविषयी पोलिसांकडून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र ताब्यात घेतलेला संशयित हा शहरातीलच असून, राजेगावकर यांच्याशी संबंधित असल्याचे समजते.दरम्यान, पोलिसांनी कोणास ताब्यात घेतले किंवा नाही याबाबत आपणास कोणतीही माहिती नसल्याचे राजेगावकर यांचे कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी अशोक चौधरी यांनी सांगितले.
चौकशीसाठी एक संशयित ताब्यात?
By admin | Updated: February 26, 2015 23:52 IST