शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

स्मार्ट सिटीच्या कारभाराची चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 16:08 IST

नाशिक- सध्या शहरात वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कारभारासंदर्भात खुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनीच तक्रार कल्याने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांंनी दिली.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांची माहिती रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई 

नाशिक- सध्या शहरात वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कारभारासंदर्भात खुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनीच तक्रार कल्याने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांंनी दिली.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या भुजबळ यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला यावेळी त्यांनी ही माहिती दिली.  स्मार्ट सिटीच्या कामकाजाविषयी सध्या कंपनीचे संचालकच नाराज असून कंपनीचे सीईओ प्रकाश थवील यांच्या कारभाराविषयी महापौर सतीश कुलकर्णी यांनी थेट कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे तक्रार केली असून ऑगस्टमध्ये बदली झालेल्या थवील यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनीसांगितले की,  नाशिक स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. विविध माध्यमातून देखील याबाबत दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहे. याबाबत नाशिकच्या महापौरांनीच आता तक्रार केली आहे. खुद्द महापौरांनी तक्रार केली म्हणजे त्यात नक्कीच तथ्य असून तथ्य असल्याशिवाय ते आरोप करणार नाही. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालू असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार होत असेल तर कठोर कारवाई करण्याची आदेश दिलेले आहे. त्यामुळे इगतपुरीच काय तर राज्यात कुठेही रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही. कुणीही कारवाई पासून वाचणार नाही  छगन भुजबळ यांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधाबाबत भुजबळ यांनी नागरिकांनी दीपावली आनंदात साजरी करावी. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजवून प्रदूषण होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. कारण फटाक्यातून अधिक वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी यंदा फटाके वाजवण्यावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन त्यांनीनागरिकांना केले.

नागपूर येथील आमदार निवासात कोविड सेंटर सुरू आहे. तसेच कोविड चे विलागीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहे त्यामुळे नागपूरला अधिवेशन नको अशी मागणी काही आमदार करीत आहे. आमदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेते व कामकाज सल्लागार समितीचे सदस्य याबाबत लवकरच योग्य तोनिर्णय घेतील असे भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीChagan Bhujbalछगन भुजबळsatish kulkarniसतीश कुलकर्णी