शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

‘सीआर’ प्रकरणाची चौकशी व्हावी

By admin | Updated: July 19, 2014 01:05 IST

दिरंगाई : नगरसेवक ढगे यांच्यासह शिष्टमंडळाचे निवेदन

नाशिक : कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल दरवर्षी लिहिणे अपेक्षित असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. या प्रकरणी शासनाच्या आदेशाला डावलून शासकीय कार्यालयांमध्ये मनमानी सुरू असल्याने या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक शैलेश ढगे यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल नोंदविण्याची जबाबदारी असणारे अधिकारी दरवर्षी अहवाल नोंद करीत नसल्याने कर्मचाऱ्यांना पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती तसेच आश्वासित योजनांपासून वंचित रहावे लागते. शिवाय अहवाल नोंदविण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची बदली झाली तर कर्मचाऱ्याला त्याच्या बदलीच्या ठिकाणी जाऊन विनवणी करावी लागते. यातून अनेक अनिष्ट आर्थिक तडजोडी केल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गोपनीय अहवाल नोंदणीबाबत शासनाने वेळोवेळी आदेश काढलेले आहेत. तसेच गोपनीय अहवाल नोंदणीचे शिबिरे घेण्याची सुचविले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचाऱ्यांची हेळसांड सुरूच आहे. कर्मचाऱ्यांना कुणीही वाली नसल्याने त्यांचे अर्थिक नुकसान होत असल्याचे नगरसेवक ढगे यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच जे अधिकारी ऐकमेकांना सांभाळून घेतात त्यांचीही चौकशी करून या कामात पारदर्शकता आणावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पूर्ववसन उपआयुक्त टी.एम. बागुल यांना निवेदन सादर करताना नगरसेवक शैलेश ढगे, नितीन विरवार, चेतन वाघ, चंद्रशेखर सरोदे, प्रमोद फडोळ, दिनेश दास, आनंद कनोजिया, गणेश गडाख, राजेंद्र देशमुख आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)