शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अभिनव वृक्ष रेखाटन प्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:20 IST

वसुंधरा दिनाचे औचित्य साधत चित्रकर्ती रत्ना भार्गवे यांचे अभिनव वृक्ष रेखाटन प्रदर्शनाचे उद्घाटन कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ पं. प्रभाकर दसककर, संगीत विदुषी डॉ. अलकादेव मारुलकर आणि छायाचित्रकार प्रसाद पवार उपस्थित होते.

नाशिक : वसुंधरा दिनाचे औचित्य साधत चित्रकर्ती रत्ना भार्गवे यांचे अभिनव वृक्ष रेखाटन प्रदर्शनाचे उद्घाटन कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ पं. प्रभाकर दसककर, संगीत विदुषी डॉ. अलकादेव मारुलकर आणि छायाचित्रकार प्रसाद पवार उपस्थित होते.  ‘एकतत्त्व वृक्ष : दृष्टी तशी सृष्टी’ या प्रदर्शनात वृक्षांची अनोखी अशी ६० रेखाचित्रे मांडली आहेत. चित्रांचे रेखाटन काळ्या व पांढऱ्या शाईने करण्यात आले आहे. रेषा आणि बिंदू यांच्या अनुरूप मेळास कल्पनाशक्तीची जोड देऊन साकारलेली ही चित्रे आपणास वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. साकारलेले वृक्षांचे प्रकार अपरिचित वाटत नाहीत, उलट आपण हे वृक्ष कुठे ना कुठे बघितले आहेत असेच जाणवते. निसर्गाकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकण्याची शक्ती या चित्रांमध्ये सामावलेली आहे हे नक्की. वृक्षांमधील चैतन्य, भावना व संवाद साधण्याची कला या रेखाटनांमधून प्रतीत होते. निष्पर्ण वृक्षांपासून फळा-फुलांनी डवरलेल्या वृक्षांना बघताना मन सस्मित होते. दीपमाळ, ज्ञानवृक्ष, काजवा वृक्ष, तारका वृक्ष, प्रकाशछाया वृक्ष अशी ६० रेखाटने पाहणाºयांना अचंबित करतात. या चित्रांच्या निरीक्षणातून अनेक कल्पना जन्म घेतात. रेषा, बिंदूंची रेखाटने बघताना चित्रकर्तीच्या अफाट श्रमाचे, कल्पनाशक्तीचे आश्चर्य वाटत राहते व निसर्गाकडे बघण्याची दृष्टी या चित्रांमध्ये आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. प्रदर्शन सोमवारी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक